35.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home राजकीय देवेंद्रजी.. ठाकरे सरकार सत्तेवर आले ही तुमचीच चूक ! मुनगंटीवार यांनी सुनावले

देवेंद्रजी.. ठाकरे सरकार सत्तेवर आले ही तुमचीच चूक ! मुनगंटीवार यांनी सुनावले

0
220

blank

मुंबई । “जास्तीत जास्त तीन महिने,नंतर देवेद्र फडणवीस तुम्हाला तुमची दीड वर्षांपूर्वीची चूक सुधारायची आहे !” अशा थेट शब्दात माजी वित्तमंत्री व भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्रातील सत्ताबदलाचे संकेत थेट विधानसभेत दिले.हे सरकार सत्तेवर आले ही देवन्द्रजी तुमचीच चूक आहे असे सुनावत,आता काहीही करा, हवी तेव्हढी ताकद लावा आणि पुन्हा सरकार मिळवा असेही मुनगंटीवार म्हणाले.अंदाजपत्रकावरील चर्चेवेळी ते बोलत होते.

विदर्भातील अनिल देशमुख सुनील केदार व विजय वडेट्टीवार या मंत्र्यांना ठाकरे सरकारमध्ये चांगली खाती मिळालेली नाहीत अशी टीका मुनगंटीवारांनी केली तेंव्हा अनिल देशमुखांनी त्यात हस्तक्षेप करत मुनगंटीवरांना म्हटले की, गेल्या पाच वर्षात तुमचा क्लेम असूनही तुम्हाला मुख्यमंत्रीपद मिळाले नाही, ते देवेंद्र फडणवीसांना मिळाले,याचे दुःख लपवतच तुम्ही फिरत होतात! इतना क्या मुस्कुरात हो, क्या गम छिपा रहे हो असे आम्ही म्हणत होतो, असा चिमटा देशमुखांनी काढला, तेंव्हा मुनगंटीवार यांनीही एक शेर पेश करत तुमची मुदत फक्त तीन महिने आहे असे सराकरला बजावले. ते म्हणाले की “कुछ देरकी खामोशी है फिर शेर आएगा सिर्फ तीन महिनेकी देरी है, फिर हमारा दौर आएगा!” पुन्हा एकदा मुनगंटीवारांनी फडणवीसांनाच सुनावले की हे सरकार सत्तेवर आले ही देवन्द्रजी तुमचीच चूक आहे. आता काहीही करा,हवी तेव्हढी ताकद लावा आणि पुन्हा सरकार मिळवा असेही मुनगंटीवार म्हणाले. आम्हालाच जनमताचा कौल होता पण हे सरकार बेईमानीने सत्तेत आले आहे.अशी टीकाही त्यांनी केली.

blank