
गोंदिया,दि.15ः त्या काळी सावित्रीबाई फुले यांनी शेण माती दगड धोंडयांचा मारा शोषून महिलांना संविधानात त्यांचे हक्क मिळवून दिले नसते तर आज कोरपट बेलना धरणा-या हातात लॅपटाॅप , कम्प्युटर दिसला नसता,महिलांना वेदना तेव्हा होतात जेव्हा त्यांच्या स्वतंत्रता ,शिक्षण व राजकीय आत्मसन्मानवर प्रहार होतो. आज ही महिलांकडे पुरूषप्रधान मानसिकतेमुळे डोळेझाक केली जाते. अशा पुरूषप्रधान मानसिकतेतून महिलांनी बाहेर पडणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन प्राध्यापिका व समाजसेविका सविता बेदरकर यांनी केले. जागतिक महिला दिनानिमित्त रविवारी नारी शक्ती महिला ग्रुप मालवीयवाॅर्ड श्रीनगर द्वारे महिला दिन सप्ताहांचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. या महिला दिन कार्यक्रमाचे उद्घाटन नगरसेविका भावना कदम व नगरसेविका निर्मला मिश्रा यांच्या हस्ते करण्यात आले. मंचकावर समाजसेविका ज्योत्सना शहारे, दिव्या भगत, मीना कुर्वे, श्रुती केकत, रेखा भरणे आदि उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून मागील वर्षभरात करोना योद्धा म्हणून सेवा देत शहीद झालेले व सध्या करोना योद्धा म्हणून सेवा देत असलेले यांच्या सन्मानात राष्टगीत गायन करून करण्यात आली. नकारात्मक विचारांना तिलांजली देउन सकारात्मक विचार अंगी बाळगल्यास यशोशिखर गाठणे कधी ही शक्य आहे येणारे आव्हान समर्थपणे पेलण्याची किमया महिलांमध्येच आहे असे प्रतिपादन या प्रसंगी नगरसेविका भावना कदम यांनी व्यक्त केले.या प्रसंगी चिमुकल्या मुलींनी देषभक्ती पर गीतांवर नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे संचालन श्रद्धा आंबेडारे, टिना रोकडे यांनी केले. आभार कार्यक्रमाची संयोजिका रूपाली रोकडे यांनी मानले. या प्रंसगी नारी शक्ती महिला ग्रुपच्या सीमा खाडे, वंदना बावणकर,सुमन राउत, फटिंग मेडम,स्वाती पवार, गीता राउत, कोमल राउत, कविता बारेवार,प्रीती सेलोकर, शुलका यादव,इंदुमती शुक्ला,तारा रोकडे, वीणा पवार, चंपा बिजेवार,ममता खाडे, पूजा खाडे, रोहिणी राउत, उमेष्वरी राउत, हितेश्वरी आंबेडारे, अर्चना बिजेवार, वर्षा रोकडे,त्रिवेणी कावळे आदी उपस्थित होते





