37.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home क्रीडा कराटे बेल्ट ग्रेडेशन स्पर्धेचे थाटात समापन

कराटे बेल्ट ग्रेडेशन स्पर्धेचे थाटात समापन

0
69

blank

सालेकसा,दि.15ः-तालुक्यातील न्यू चैम्पियन कराटे क्लब साखरिटोलाच्या वतीने 14 मार्च रोजी कराटे-वुशु बेल्ट ग्रेडेशन स्पर्धेचे आयोजन जिल्हा परिषद हायस्कूल साखरीटोला येथील पटांगणावर पार पडली. कार्यक्रमाचे उदघाटन माजी सभापती लता दोनोडे यांच्या अध्यक्षतेखाली महिला काँग्रेसकमिटीच्या प्रतिनिधी वंदनाताई काळे यांच्या हस्ते पार पडले. मंचपूजन भाजप महिला आघाडीच्या टीना चुटे यांनी केले. यावेळी प्रमुख अतिथि म्हणून डॉ संजय देशमुख, डॉ. अजय उमाटे जिल्हा अध्यक्ष होमियोपैथी संघटन, राजू काडे, प्रा. सागर काटेखाये, उपसरपंच अफरोज पठान, निलकंठ दोनोडे, जी.डी. भेडारकर, रजत दोनोडे उपस्थित होते. निलकंठ दोनोडे मार्शल आर्ट ब्लेक बेल्ट यांच्या पुढाकाराने साखरीटोला येथे पहिल्यांदाच कराटे-वुशु बेल्ट ग्रेडेशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यांच्याच प्रयत्नiमुळे आज घडिला ब्लैक बेल्ट विद्यार्थ्यांची संख्या साखरीटोला परिसरात सर्वाधिक आहे. मुलाचा शारीरिक,मानसिक, व बौद्धिक विकास व्हावा प्रत्येकामधे कमीत कमी आत्मरक्षन करण्याची बुद्धि व शक्ति असावी यासाठी कराटे, वुशु, ताइक्वांडो, मार्शल आर्ट, सारखे मैदानी खेळाची आवड़ असणे काळाची गरज असल्याचे मत सुनील शेंडे सेन्साई ब्लैक बेल्ट डॉन ग्रेंडमास्टर, संजय नागपूरे सेन्साई,निलकंठ दोनोडे यांनी व्यक्त केले.ते कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे पुरस्कार वितरण भाजपा व्यापार आघाडीचे महामंत्री सुनील अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली राकांपा ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर दोनोडे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश चुटे, भाजप तालुका महामंत्री देवराम चुटे, सौ. प्रिया शरणागत,ग्रा.प. सदस्या श्वेता अग्रवाल, राजू डोंगरे,अनिल ड़ोये, कु.ममता गायधने प्रमुख अतिथि म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यानी डेमो सादर करून आत्मरक्षण करने संबंधित उलेखनीय प्रयोग, पोटावर आणि डोक्यावर वीटा तोडने, टाइल्स तोडने, धावत येऊन मड़का फोड़ने असे करतब दाखवून दर्शकाना मंत्रमुग्ध केले याप्रसंगी विद्यार्थ्यांना ऑरेंज बेल्ट, ग्रीन बेल्ट, ब्राउन बेल्ट व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन रजत दोनोडे यांनी तर उपस्थिताचे आभार कु.ममता गायधने यांनी मानले.

blank