34.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home राजकीय विजय शिवणकर गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे जिल्हाध्यक्ष

विजय शिवणकर गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे जिल्हाध्यक्ष

0
204

blank

गोंदिया: राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे नेते खासदार प्रफुल पटेल यांचा अनुशंसेवर प्रदेशाध्य्क्ष ना. जयंत पाटिल यांनी विजय शिवणकर यांची जिल्हा अध्यक्ष पदावर नियुक्ती केली आहे. गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या जिल्हाअध्यक्ष स्व. पंचम बिसेन यांच्या अकस्मात निधना मुळे रिक्त झालेल्या पदावर विजय शिवणकर यांची नियुक्ती झाली आहे .
विजय शिवणकर हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व अन्य पदाधीकारी म्हणून काम करण्याचा अनुभव आहे व सामान्य कार्यकर्ताला घेऊन संघटनात्मक बांधणी करून राष्ट्रवादी पक्षाला सक्षम करण्यात यश मिळेल अशी राष्ट्रवादी पक्षाने अपेक्षा व्यक्त केली आहे. जिल्हा अध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्या बद्दल पूर्व आमदार राजेंद्र जैन, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, गंगाधर परशुरामकर, विनोद हरिखेडे, जिल्हयातिल सर्व पक्ष पदाधिकारीयांनी व कार्यकर्ताने अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

blank