41.6 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ सुजाताच्या मारेकऱ्यांला तात्काळ अटक करा

सुजाताच्या मारेकऱ्यांला तात्काळ अटक करा

0
78

blank

अर्जुनीमोरगाव :रविवारी मुंबई येथील बौद्ध समाजाची तरुणी सुजाता हीला एका व्यक्तीने धारधार चाकुन वार करुन आईवडीलांच्या समोरच ठार मारले, तरी त्या मारेक-याला अटक करुन योग्य ती शिक्षा म्हणजे फाशी देण्यात यावी अशी मागणी आंबेडकरी समाजातील तरुणांनी केली आहे.

अत्याचार, बलात्कार, गॅगरेप, छेडछाड, अशाप्रकारचे कृत्य आमच्या बौद्ध, आंबेडकरी समाजाच्या नागरिकांवर का होतात, आमचे नेते-पुढारी हे फक्त खूर्चीपुरता आणि स्व:तच्या स्वार्थासाठी जगतात, समाजासह समाजातील पुरुष, महीला, तरुण-तरुणीवर अशाप्रकारचे अशोभणीय कार्य होत आहेत तरी साधा न्याय मिळवून देऊ शकत नाही ही फार गंभीर शोकांतिकाच आहे.सदर घटनेचा गांभीर्यपूर्वक तपास केला जात नाही, सुजाताच्या परिवाराला संविधानाच्या देशात, राज्यात जर न्याय मिळत नसेल तर कुठे असेल ही लोकशाही असा सवालही यावेळी निवेदनकर्ते नंदागवळी यांनी केली.

या घटनेचा निषेध करीत त्या मारेक-याला अटक करुन फाशी झालीच पाहीजे अशी मागणीचा निवेदन उपविभागीय अधिकारी तसेच  तहसीलदार अर्जुनीमोरगाव यांना देण्यात आले. यावेळी निवेदन सादर करताना उपस्थित मुन्नाभाई नंदागवळी, दिलवर रामटेके, प्रभाकर दहीकर, प्रितम रामटेके, धम्मदीप मेश्राम, मयुर खोब्रागडे यादी हजर होते.

blank