34.3 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ नक्षलवाद्याना भारतिय संविधान मान्य नाही त्यांचा निषेध करा -एसडीपीओ जयदत्त भंवर

नक्षलवाद्याना भारतिय संविधान मान्य नाही त्यांचा निषेध करा -एसडीपीओ जयदत्त भंवर

0
47

blank

कुरखेडा- शासन संविधानाचा आधारेच आदिवासी जनतेला मूख्य प्रवाहात आणण्याकरीता पेसा कायद्याचा अमलबजावणी सह विविध विकासाचा योजणा राबवित आहे मात्र विकास क्रमात अवरोध निर्माण करणार्या नक्षलवाद्याना डॉ बाबासाहेब आंबेडकर यानी निर्माण केलेला संविधानच मान्य नाही त्याना अराजकता निर्माण करायची आहे या विघातक प्रवृत्तीचा आदीवासी जनतेने निषेध करीत नक्षलबंदोबस्ता करीता नेटाने लढा उभारणारे महाराष्ट्र पोलीसांचा सि-60 पथकाचे अभिनंदन करावे असे आवाहन कुरखेडा चे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भंवर यानी केले आहे.
निष्पाप आदिवासी जनतेचा जीवावर उठलेल्या नक्षल संघटनानी मागील तिस वर्षात ५ हजार पेक्षा अधिक आदिवासी जनतेची निर्घून पणे हत्या केली आहे मंगेझरी,मूरमूरी व जांभूळखेडा येथे भूसूरंगद्वारे पोलीस पथकाचे हत्याकांड घडवून आणले ही निर्दयी संघटना आता प्रचार पत्रकाद्वारे पोलीसा विरोधातच अपप्रचार करीत आहे याची आदीवासी जनतेने कोणतीच दखल घेऊ नये व नक्षल कृत्याचा व संघटनेचा निषेध करावा तसेच आदीवासींचा संरक्षण व विकासा करीता कार्यरत विविध माध्यमाद्वारे ३ हजार बेरोजगार आदीवासी यूवकाना रोजगाराची संधी निर्माण करून देणारे महाराष्ट्र पोलीसांचा सि-60 पथकाचे अभिनंदन करावे असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भंवर पोलीस उपनिरीक्षक कूलदीप सोनटक्के हवालदार राधेश्याम फूलकंवर उमेश नेवारे यानी पत्रकाद्वारे केले आहे

blank