34.7 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home राजकीय शिवसेनेला साथ देणारे एमआयएमचे तीन नगरसेवक निलंबित…!

शिवसेनेला साथ देणारे एमआयएमचे तीन नगरसेवक निलंबित…!

0
52

blank

औरंगाबाद, दि.20 मार्च– जळगांव महापालिका महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत एमआयएमचे तीन नगरसेवकांनी शिवसेनेला मत दिल्याने प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. गफ्फार कादरी यांनी जिल्हाध्यक्ष सहीत कारणे दाखवा नोटीस बजावून पक्षातून तीन नगरसेवकांना निलंबित केले आहे. अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
डॉ. गफ्फार कादरी यांनी यावेळी सांगितले पक्षाच्या धोरणाविरोधात नगरसेवकांनी असे केल्याने 21 मार्चपर्यंत कारणे दाखवा नोटीसचा खुलासा करण्यासाठी जिल्हाध्यक्ष व नगरसेवकांना औरंगाबाद येथे पाचारण करण्यात आले आहे. उत्तर मिळाल्यानंतर पक्षाचे सुप्रीमो खा.असदोद्दीन ओवेसी व प्रदेशाध्यक्ष तथा खा.सय्यद इम्तियाज जलील यांना अहवाल पाठवण्यात येईल त्यावर वरिष्ठ नेते निर्णय घेतील. जळगावचे एमआयएमचे जिल्हाध्यक्ष झिया अहेमद अब्दुल करीम बागवान, नगरसेवक रियाज अहेमद अब्दुल करीम बागवान, नगरसेविका सईदा युसुफ शेख, नगरसेविका सुन्ना राजु देशमुख यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेत औरंगाबादचे शहराध्यक्ष शारेक नक्शबंदी, माजी नगरसेवक विकास एडके उपस्थित होते.

blank