34.8 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home Top News रोजगारासाठी लोक बाहेर पडणारच, त्यांना लाठ्या-काठ्यांनी मारू नका -गृहमंत्री

रोजगारासाठी लोक बाहेर पडणारच, त्यांना लाठ्या-काठ्यांनी मारू नका -गृहमंत्री

0
143

blank

नागपूर,दि.20ः- कोरोना आणि लॉकडाउनमुळे नागरिक आधीच त्रस्त आहेत. राज्याचे आर्थिक चक्र थांबले आहेत. अशात नागरिकांवर अतिरेकी बळाचा वापर करू नका. निर्बंध आणि लॉकडाउनची स्थिती योग्य पद्धतीने हाताळावी. अशा सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिस प्रशासनाला केली आहे.

गृहमंत्र्यांनी साधला व्हर्चुअल संवाद
लॉकडाउन संदर्भात आयोजित आढावा बैठकीला नागपुरातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून गृहमंत्र्यांनी हजेरी लावली. लॉकडाउन जेव्हा कडक होते, त्यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. पोलिसांनी कडक संचारबंदीची अंमलबजावणी केली. परंतु आता पूर्णत: लॉकडाउन नाही. त्यामुळे लोकांना लाठाकाठ्यांनी मारू नका. बळाचा अतिरेकी वापर करू नका. नियंत्रण ठेवा मात्र कुणी उपद्रव निर्माण करीत असेल तर त्याला सोडू नका अशा सक्त सूचना गृहमंत्र्यांनी दिल्या.

वाहतूकीचे कारवाया नेहमीप्रमाणेच
दरम्यान, कोरोना अद्यापही कायम आहे. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवायचे आहे. अशात रोजगाराच्या निमित्ताने लोक घराबाहेर पडणारच. त्यामुळे योग्य अशी कारवाई करावी असे गृहमंत्री म्हणाले. हेल्मेट, सीटबेल्ट आदीच्या कारवाई मात्र नेहमीप्रमाणे सुरू ठेवाव्या असेही गृहमंत्र्यांनी सांगितले आहे.

blank