41.6 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ भंडारा जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियन  जिल्हा बैठक संपन्न 

भंडारा जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियन  जिल्हा बैठक संपन्न 

0
79

blank

भंडारा :-  महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक) जिल्हा शाखा भंडारा ची महत्त्वाची बैठक २१ मार्च २०२१रविवार रोजी  राणा भवन भंडारा येथे   जिल्हा अध्यक्ष सविता लुटे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य कार्याध्यक्ष काँ दिलीप उटाणे , जिल्हा कार्याध्यक्ष काँ. हिवराज उके,अल्का बोरकर, मंगला रंगारी, गौतमी मंडपे, मंगला गजभिये ,रेखा टेंभुर्णे , छाया गजभिये,  अनिता घोडीचोरे, वंदना पशिने यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.
एकात्मीक बाल विकास सेवा योजना  विभागाने  मराठीत असलेला काँमन  अप्लीकेशन साँफ्टवेअर  बंद करुन  नविन पोषण टँकर आँप्स इंग्रजी/ हिंदी  साँफ्टेवेअर  तयार करण्यात आला .त्यामूळे अंगणवाडी सेविकांना अडचण निर्माण झाली असल्यामुळे  आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन व अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने मा आयुक्त यांना पोषण ट्रकर अप्लीकेशन  कँस  सुधारणा करण्यासाठी निवेदन  देण्यात आले* . त्याचे वाचन बैठकीत  करुन *जो पर्यत  पोषण टँकर अँप्स मराठीत केला जात नाही तो पर्यत भंडारा जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका  माहीत भरणार नाही.तसेच प्रकल्प अधिकार व पर्यवेक्षीका यांनी दडपण घातल्यास  ञास दिल्यास सर्व  मोबाईल प्रकल्प कार्यालयात जमा  व कामबंद करण्याचा  निर्णय घेण्यात आला.
 केंद्र शासनाने पोषण टँकर मध्ये  इंग्रजी / हिंदी / गुजराती भाषेचा समावेश करण्यात आला ,मराठीचा ही समावेश करावे.,भंडारा  जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रलंबीत मागण्या बाबत आठ दिवसात  बैठक करण्यात येईल असे आश्वासन खुद्द जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले होते  परंतु तिन महिने झाले  दिलेले आश्वासन पाळले नसल्यामुळे  एप्रिल  महिन्यात आयटकच्या वतिने चक्ररी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
 अंगणवाडी सेविकांनी (CAS ) काँमन  अप्लीकेशन साँफ्टवेअर मध्ये अंगणवाडी सेविकांनी सर्वेक्षणापासून तर दैनिदिनी कामकाजाचा डाटा CAS मध्ये मराठीत  भरलेला आहे..परंतु  मागील साँफ्टवेअर मध्ये बदल करुन  नविन पोषण ट्रकर  अप्लीकेशन  मध्ये  मागील भरलेला डाटा सहित भरावा असे सुचविण्यात आहे आहे .या पोषण ट्रकर मध्ये सर्व माहीती इंग्रजी / हिंदी मध्ये  भरणे गरजेचे आहे .त्यामुळे अनेक सेविका अडचणीत आल्या आहेत. षण ट्रकर अँप्स मराठीत करण्यात यावी असी मागणी सेविकांची आहे.तसेच यापूर्वी सेविकांनी CAS मध्ये लाभार्थीनुसार संपूर्ण माहिती भरलेली आहे.
अंगाणवाडी सेविकेनी केंद्राअंतर्गत भरलेला डाटा ब्ँकअप घेवून घेवून पोषण ट्रकर अप्लीकेशन मध्ये सिंकोनाईज करुन दिल्यास अंगणवाडी सेविकांना अंगणवाडी स्तरावर सेविकांना  डाटा अँपलोड करणे सोईस्कर होईल.अंगणवाडी सेविका या ग्रामीण भागातील असल्यामुळे तांत्रिक काम करताना त्यांना वरीलप्रमाणे डाटा सिंकोनाईज करुन दिल्यास अधिक सोयीचे होईल. असे आयटकने सुचविले आहे .तरीपण काही पर्यवेक्षीका आपले मानधन मिळणार नाहीत असे मेसेज सेविकांना टाकून धमकावीत आहेत .हेचुकीचे असल्याचे मत राज्य कार्याध्यक्ष काँ दिलीप उटाणे यांनी सांगितले.जोर जबराईने  कोणतेही काम होत नाही .अंगणवाडी सेविकेची कामकाजाची वेळ सकाळी १० ते २.३० वा पर्यतच आहे.जर मुजोरपणाने वागत असेत तर  कामकाज वेळे पुर्वी व नंतर कार्यालयीन फोन घेवू नये.विविध प्रलंबीत  मागण्यावर चर्चा करण्यात आली.
बैठकीला संजू लोंदासे,  गौतमी धवसे, कांचन मेशराम,निर्मला बांन्ते , जयनंदा कांबळे,  उषा रणदिवे, विद्या गणविर, मंगला गभने,  मनिषा गणवीर,  वैशाली भोंडे,निर्मला बुराडे , निरंजना शेडे ,अर्चना खरवडे , पुजा मानापूरे  इत्यादी जिल्हा सदस्य  उपस्थित होते.मागिल बैठकचे इतिवृत्त व प्रास्ताविक  अल्का बोरकर  यांनी केले तर आभार समारोप सविता लुटे यांनी केले.वरील माहिती एका प्रसिद्धीपञका द्वारे काॅ. हिवराज उके जिल्हा सचिव आयटक यांनी कळविली आहे.

blank