37.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home शैक्षणिक शिक्षक समिती सडक अर्जुनीच्या कार्यकारिणीने घेतली गटशिक्षणाधिकारी यांची भेट

शिक्षक समिती सडक अर्जुनीच्या कार्यकारिणीने घेतली गटशिक्षणाधिकारी यांची भेट

0
103

blank

कोसमतोंडी-(महेंद्र टेंभरे):- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या नवनियुक्त तालुका कार्यकारिणीने जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरवार यांच्या मार्गदर्शनात नवनियुक्त तालुकाध्यक्ष प्रदीप बडोले यांच्या नेतृत्वात पंचायत समिती सडक अर्जुनीचे गटशिक्षणाधिकारी एस के सर्यांम यांचीं भेट घेत प्रलंबित शिक्षक समस्यावर चर्चा केली.
शिक्षक समिती सडक अर्जुनीच्या वतीने आयुक्त कार्यालयाला जी तक्रार दाखल केली,त्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना जे कार्यवाहीबाबत पत्र आले आहे. त्यावर कार्यवाही करुन जिल्हा परिषदेला या संदर्भात पुन्हा पत्रव्यवहार करणे व वेळप्रसंगी कायदेशीर न्यायालयीन लढाई पंचायत समिती मार्फत लढावी अशी मागणी करण्यात आली. त्यावर तात्काळ जिल्हा परिषद पत्रव्यवहार करण्याचे ठरविण्यात आले.

चतोपाध्याय व निवडश्रेणी प्रकरण बाबतीत ज्यांना 12 व 24 वर्ष झाले असतील व ज्यांचे प्रस्ताव अप्रप्त असतील त्यांचे प्रस्ताव मागविण्यात येणे व पुढिल कार्यवाही साठी जिल्हा परिषद पाठविणे.सेवपुस्तिका मधील नोंदी तात्काळ पूर्ण करणे.ज्यांना जिल्हा परिषद कार्यालयाने परीक्षा परवानगी दिली,त्यांच्या सेवापुस्तकात नोंदी तात्काळ घेण्यात यावे.सत्र 2018- 19 च्या पावत्या पावती मिळणार नाही त्यांचे नावासहीत यादी जिल्हा परिषदेला पाठवून पावती मिळण्यासाठी  पाठपुरावा करण्याचे आश्वासन देण्यात आले. सेवानिवृत शिक्षकांचे प्रलंबित देयके तयार करुन निधीची मागणी करणे, सोबतच जे शिक्षक यानंतर सेवानीवृत होणार त्यांचे प्रस्ताव सादरीकरण साठी 5 महिने पुर्वी पासूनच कार्यालय मार्फत रितसर कार्यवाही करुन मंजूरीसाठी प्रयत्नशील असल्याचे संगितले.भेटीवेळी किशोर डोंगरवार, प्रदीप बडोले, संदीप तिडके, बाळू वालोदे , नरेश मेश्राम, जी आर गायकवाड, महेश कवरे, पी एन बडोले, जी जे कापगते, आनंद मेश्राम, राजेश शेंडे, मंगेश पर्वते, संदीप खेडीकर, एच एन परशुरामकर, डी पी शहारे, अरुण वैद्य, महेश भिवगडे जीवन म्हशाखेत्री उपस्थीत होते.

blank