
कुरखेडा,दि.25ः शहराजीकच्या वाकडी येथील शेतशिवारात गांजाची शेतकी केली जात असल्याची मातिी मिळताच ठाणेदार सुधाकर देडे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली धाड टाकून २ लाख ६४ हजार ५00 रूपये किंमतीचा गांजा तसेच २५ हजार रूपयांची दुचाकी असा २ लाख ८९ हजार ५00 रूपयांचा मुद्देमाल काल २३ मार्च रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास जप्त केला.
याप्रकरणी कुंडलीक मुंगसू कसारे (६५) रा. आझाद वॉर्ड कुरखेडा, सौरव संतोष डहाळे (२0), रितिक राधेश्याम मच्छिरके दोन्ही रा. चिखली ता. कुरखेडा असे अटक करण्यात आलेल्या गांजा तस्करांची नावे आहेत.
आरोपी कुंडलीक कसारे याने आपल्या शेतशिवारात बेकायदेशिरित्या गांजाची शेती केली होती. सौरव डहाळे व रितीक मच्छिरके हे दोघेही शेतावर गांजा खरेदीसाठी आले होते. ते गांजा खरेदी करून आपल्या ताब्यात घेताना आढळून आले. यावेळी पोलिसांनी धाड टाकून तिघांनाही अटक केली. त्यांच्याकडून २ लाख ६४ हजार ५00 रूपये किंमतीचा गांजा तसेच २५ हजार रूपयांची दुचाकी असा एकूण २ लाख ८९ हजार ५00 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी तिन्ही आरोपीविरोधात गुगीकार औघधी द्रवरू मनोव्यापरावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम एनडीपीएस १९८५ चे कलम ८(क), २0 (अ),(ब),(क),२२(क) प्रमाणे कुरखेडा पोलिस ठाण्यात अंमली पदार्थ प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सदर कारवाई पोलिस निरीक्षक सुधाकर देडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक नारायण शिंदे, चापोहवा मानकर, पोहवा बारसागडे, पोशि ललीत जांभुळकर, लोमेश मेर्शाम, मनोहर पुराम, मपोशि अश्विनी रामटेके यांनी केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुधाकर देडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक नारायण शिंदे करीत आहेत.