37.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home गुन्हेवार्ता अकोला एसीबीने केला बुलढाणा एलसीबीच्या एएसआयचा गेम…

अकोला एसीबीने केला बुलढाणा एलसीबीच्या एएसआयचा गेम…

0
170

blank

अकोला,दि.२४ःबुलढाणा गुन्हे शाखेत काम करणाऱ्या एका एएसआयकडून वाळू व्यावसायिकाला पैशासाठी त्रास दिला जात असल्याने त्या त्रासाला कटांळून अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे नुकतीच लेखी तक्रार दाखल केली होती.त्या तक्रारीच्या अनुषंगाने अकोला एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता त्यात सत्यता आढळून आल्याने अकोला एसीबीच्या पथकाने उपाधीक्षक मिलिंद बहाकर यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात सापळा रचला आणि बुलढाणा एलसीबीच्या सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक गजानन माळी ह्याला १४,००० रुपयांची लाच रक्कम घेत असताना पंचांसमक्ष रंगेहाथ अटक केली.ह्या प्रकरणांत अकोला एसीबीच्या अधिकाऱ्यांकडून स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलिस उप निरीक्षक गजानन माळीच्या विरुद्ध पोलिसांत भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

blank