38.6 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ जगत महाविद्यालयात रक्तगट तपासणी व रक्तदान शिबिर संपन्न

जगत महाविद्यालयात रक्तगट तपासणी व रक्तदान शिबिर संपन्न

0
47

blank

गोरेगाव- स्थानिक जगत कला, वाणिज्य व इंदिराबेन हरिहरभाई पटेल विज्ञान महाविद्यालय गोरेगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे रक्तगट तपासणी व रक्तदान शिबिर यशस्विरीत्या संपन्न झाले. या शिबीरात बहुसंख्य विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबीर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.वाय. लंजे तर व्यासपीठावर डाॅ. संजय चव्हाण, उपप्राचार्य डाॅ. एस. एस.भैरम,डाॅ. जे.बी. बघेले, डाॅ. प्रेरणा धनविज प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे औचित्य साधून डाॅ. प्रेरणा धनविज यांनी मार्गदर्शनातून रक्तदानाचे महत्व विशद केले. अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डाॅ. एन. वाय.लंजे यांनी समाजाचे ॠण फेडण्याचे महत्वपूर्ण कार्य हे रक्तदान असून रक्तदान करणे ही खरी समाजसेवा आहे, रक्तदान हेच खरे महादान आहे अशाप्रकारचे मौलिक विचार प्रकट केले. रक्तदान शिबिर प्रसंगी विनोद बनसोड,डाॅ. विजय रहांगडाले,प्रा.लोकेश कटरे तसेच गंगाबाई रक्तपेढीचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा.लोकेश कटरे यांनी केले.रक्तदान शिबिराला यशस्वी करण्याकरीता राष्ट्रीय सेवा योजनाच्या स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले .

blank