गोंदिया,दि.28 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून
आज 28 मार्च रोजी प्राप्त अहवालात जिल्ह्यात नवे 107 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. 51 कोरोना
पॉझिटिव्ह रुग्णांनी औषधोपचारातून कोरोनावर मात केल्याने त्यांना आज सुट्टी देण्यात आली.
आजपर्यंत 15,633 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. 14,705 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली
आहे. क्रियाशील असलेल्या जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 740 आहे. 564 क्रियाशील असलेले बाधित रुग्ण
घरीच अलगीकरणात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 188 रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण
आजारातून बरे होण्याचे प्रमाण 94.06 टक्के आहे. बाधित रुग्णांचा मृत्यू दर 1.20 टक्के आहे तर डब्लिंग रेट 380.2
दिवस आहे.
जिल्ह्यात आज 107 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्या रुग्णांची संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे.
गोंदिया-51, तिरोडा-05, गोरेगाव-02, आमगाव-07, सालेकसा-05, देवरी-14, सडक अर्जुनी-06, अर्जुनी
मोरगाव-17 रुग्ण आढळून आले. जिल्ह्यातील 51 रूग्णांनी आज कोरोनावर मात केली. तालुकानिहाय रुग्ण
संख्या पुढीलप्रमाणे. गोंदिया-27, तिरोडा-09, गोरेगाव-06, आमगाव-01, सालेकसा-00, देवरी-00, सडक
अर्जुनी-04, अर्जुनी मोरगाव-03 व इतर राज्य/जिल्हा-01 रुग्णांचा समावेश आहे.
गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत कोरोना
विषाणूच्या तपासणीसाठी आतापर्यंत 101544 नमुने पाठविण्यात आले. यामध्ये 88806 नमुने निगेटिव्ह
आले तर 9318 नमुने पॉझिटिव्ह आले. 173 नमुन्यांचा अहवाल प्रलंबीत आहे. रॅपिड अँटीजेन चाचणीतून
आतापर्यंत 86884 व्यक्तींचे नमुने घेण्यात आले. यामध्ये 80306 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले तर 6578
व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले. कोरोना वॉर रूममधून बाधित रुग्णांसाठी 24 तास सेवा उपलब्ध
आज 56 नवीन कोरोना बाधित तर 47 कोरोनामुक्त
गडचिरोली,.28: आज जिल्हयात 56 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 47जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 10490 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9960 वर पोहचली. तसेच सद्या 421 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 109 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.95 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 4.01 टक्के तर मृत्यू दर 1.04 टक्के झाला.
नवीन 56 बाधितांमध्ये गडचिरोलीतील 17, अहेरी तालुक्यातील 8, आरमोरी तालुक्यातील 3, भामरागड तालुक्यातील 1, चामोर्शी तालुक्यातील 2, धानोरा तालुक्यातील 1, एटापल्ली तालुक्यातील 04, कुरखेडा तालुक्यातील 1, तर वडसा तालुक्यातील 19 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 47 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 18, आरमोरी 7, भामरागड 08, धानोरा 6, एटापल्ली 02, कुरखेडा 02, तर वडसा मधील 4 जणांचा समावेश आहे.
नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील बाधितामध्ये नवेगाव 01,साई नगर 02, अमीर्झा 01, वनश्री कॉलोनी 02, राखी गुरवडा, 02, गणेश नगर 01, कन्नमवार वार्ड 01, आंनद नगर 01,गीलगाव 02, गोकूल नगर वार्ड 5 सोनकूर 01, जेप्ररा 01, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये आलापल्ली 08, स्थानिक 01, नागेपल्ली 1, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 03, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 01, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 02, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 02, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये सीआरपीएफ 01, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये मारपल्ली 2, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये कस्तुरर्बा वार्ड 01, आर्शीवाद वार्ड 01, किदवही वार्ड 01, हनुमान वार्ड 03, कुरुड 4, विसारो 01,कोन्डाला 02, मधुबन कॉलोनी 04, गांधी वार्ड 02, तर इतर जिल्हयातील बाधितामध्ये 2 जणांचा समावेश आहे.
वाशिम जिल्ह्यात आणखी ३७७ कोरोना बाधित
वाशिम शहरातील चामुंडादेवी मंदिर परिसरातील ३, सिव्हील लाईन्स येथील ६, दंडे चौक येथील १, दत्त नगर येथी १, देवपेठ येथील २, गुरुवार बाजार येथील ५, आययुडीपी कॉलनी येथील ७, जलसंधारण विभाग येथील १, नवोदय विद्यालय परिसरातील ३, काळे फाईल येथील १, काटा रोड परिसरातील १, काटी वेस येथील १, लाखाळा येथील ३, नंदीपेठ येथील २, पाटणी चौक येथील ३, पोलीस स्टेशन परिसरातील १, संतोषी माता नगर येथील १, शिवाजी चौक येथील १, शुक्रवार पेठ येथील ५, सुंदरवाटिका येथील १, स्वामी समर्थ नगर येथील २, तिरुपती सिटी येथील १, नालंदा नगर येथील १, टिळक चौक येथील १, गवळीपुरा येथील १, नगरपरिषद परिसरातील २, मंत्री पार्क येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, ब्राह्मणवाडा येथील १, अडोळी येथील ६, जांभरुण जहागीर येथील १, जांभरुण नावजी येथील १, जयपूर येथील १, काजळंबा येथील १, केकतउमरा येथील १, खंडाळा येथील १, कृष्णा येथील १, पांडव उमरा येथील १, पार्डी टकमोर येथील २, पिंपळगाव येथील १४, सोनखास येथील १, सुराळा येथील ४, टो येथील १, तोंडगाव येथील १, वाळकी येथील २, चिखली येथील १, अनसिंग येथील ४, ब्रह्मा येथील १, एकांबा येथील १, सावरगाव बर्डे येथील १, मालेगाव तालुक्यातील जऊळका येथील १, किन्हीराजा येथील १, खिर्डा येथील १, मेडशी येथील १, पांगरी येथील ५, दुबळवेल येथील १, ताकतोडा येथील २, खैरखेडा येथील २, केळी येथील १, शेलगाव बोन्दाडे येथील २, मंगरूळपीर शहरातील पंचशील नगर येथील २, अशोक नगर येथील २, बंजारा कॉलनी येथील १, बायपास रोड परिसरातील ३, दर्गा चौक येथील ३, धनगरपुरा येथील १, दिवाणपुरा येथील २, इरिगेशन कॉलनी येथील १, महात्मा फुले चौक येथील १, महावीर चौक येथील १, मंगलधाम येथील १, बस डेपो परिसरातील २, बिरबलनाथ मंदिर जवळील १, संभाजी नगर येथील १, बसस्थानक परिसरातील १, वार्ड क्र. १ येथील ३, शहरातील इतर ठिकाणचे ९, आरक येथील १, बालदेव येथील ४, गणेशपूर येथील ४, जोगलदरी येथील ४, खापरदरी येथील १, कुंभी येथील ५, माळशेलू येथील १, मंगळसा येथील १, मानोली येथील १, मोहरी येथील १, नवीन सोनखास येथील ३, पेडगाव येथील १३, पिंपळखुटा येथील १, पोघात येथील १, शहापूर येथील ३, शेलूबाजार येथील १, चिचखेडा येथील १, रामगड येथील १, सोनखास येथील २, स्वासीन येथील २, चिंचोली येथील १, दाभाडी येथील १, तुळजापूर येथील १, उंबरा येथील १, वरुड येथील २, वनोजा येथील ३, तऱ्हाळा येथील १, गिंभा येथील १, रिसोड शहरातील अनंत कॉलनी येथील २, आसन गल्ली येथील २, बेंदरवाडी येथील १, भाजी बाजार येथील १, ब्राह्मणगल्ली येथील १, सिव्हील लाईन्स येथील १, धोबी गल्ली येथील १, एकता नगर येथील १, गजानन नगर येथील १, इंदिरा नगर येथील १, महानंदा नगर येथील २, सराफा लाईन येथील २, महात्मा फुले नगर येथील १, रामनगर येथील ३, शिवाजी नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ६०, आगरवाडी येथील १, भोकरखेडा येथील १, बिबखेडा येथील २, नेतान्सा येथील १, डोणगाव येथील १, घोन्सर येथील १, कंकरवाडी येथील १, लोणी येथील २, निजामपूर येथील २, पळसखेड येथील १, पवारवाडी येथील १, पेनबोरी येथील १, सवड येथील ४, व्याड येथील १, वाकद येथील १, येवता येथील १, रिठद येथील १, मोप येथील २, शेलगाव येथील १, आंचळ येथील ३, जांब आढाव येथील १, केनवड येथील २, कुकसा येथील १, देऊळगाव बंडा येथील १, करडा येथील १, कारंजा शहरातील आझाद नगर येथील १, पाटबंधारे विभाग येथील १, मोहन नगर येथील १, जुने सरकारी हॉस्पिटल परिसरातील १, उपजिल्हा रुग्णालय परिसरातील २, मस्जिदपुरा येथील १, शिवाजी नगर येथील १, शिक्षक कॉलनी येथील १, सिंधी कॅम्प येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, दोनद येथील १, लोहगाव येथील १, पोहा येथील १, कामरगाव येथील १, लाडेगाव येथील १, गिर्डा येथील १, म्हसला येथील १, मानोरा शहरातील ८, दापुरा येथील १, गादेगाव येथील ३, गव्हा येथील १, पोहरादेवी येथील ३, सोमठाणा येथील १, वाईगौळ येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील ४ बाधिताची नोंद झाली असून २४७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, रिसोड येथील ६३ वर्षीय व्यक्ती व अडगाव (ता. वाशिम) येथील ५७ वर्षीय व्यक्तीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
वर्धा आज पॉझिटिव्ह : 303,एकूण पॉझिटिव्ह :18217,एकूण मृत्यू : 437.आतापर्यंत एकूण डिस्चार्ज : 15919,आजचे एकूण डिस्चार्ज : 113
अकोला आज पॉझिटिव्ह : 376,एकूण पॉझिटिव्ह : 27200,मृत्यू : 446,आतापर्यंत डिस्चार्ज : 20260
आजचे डिस्चार्ज : 525,सक्रिय रुग्ण : 6494





