
नवी दिल्ली,-चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल भारत सरकारतर्फे दिला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांना जाहीर झाला आहे. गुरूवारी सकाळी दिल्ली येथील पत्रकार परिषदेत केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी त्याची घोषणा केली.
प्रकाश जावडेकरांनी केली घोषणा चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगादानाबद्दल भारत सरकारतर्फे चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके पुरस्कार दिला जातो. यंदाचा पुरस्कार दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांना जाहीर झाला आहे. याआधी दादासाहेब फाळके पुरस्काराने अमिताभ बच्चन, गुलजार, भूपेन हजारिका, मनोज कुमार, श्याम बेनेगल, मन्ना डे, लता मंगेशकर, देव आनंद यांना गौरवण्यात आले आहे.