31.2 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ मागासवर्गीय अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या समस्या मार्गी लावा

मागासवर्गीय अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या समस्या मार्गी लावा

0
56

blank

अर्जुनी-मोरगाव : तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे प्रश्न व समस्या निकाली काढण्याकरिता बुधवार, 31 मार्च रोजी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश वासनिक यांच्या नेतृत्त्वात शिष्टमंडळाने बालविकास प्रकल्प अधिकारी प्रियंका किरणापुरे यांची त्यांच्या कक्षात प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले.
या वेळी अनेक प्रश्न व समस्या महासंघाने चर्चेसाठी घेतलेल्या होत्या. सर्व समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी वरिष्ठ सहाय्यक कैलास पंचभाई उपस्थित होते.
कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या 12 फेब्रुवारीला झालेल्या बैठकीमध्ये आपले अधिनिस्त असलेल्या मृतक सेवानिवृत्त अंगणवाडी मदतनीस स्नेहलता गोपाल लाडे यांची एकरकमी पेंशन त्यांच्या वारसदारांना मिळणे संदर्भाने तातडीने कार्यवाही करण्यात यावी. मार्च 2021 चे मानधन, 14 एप्रिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपूर्वी करण्यात यावे. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सेवाज्येष्ठतेनुसार दर पाच वर्षांनी मानधन वाढ देण्यात यावी. अंगणवाडी सेविकांचे प्रलंबित प्रवास भत्ता देयके तातडीने काढण्यात यावे. अंगणवाडी सेविकांच्या मासिक सभा बीट स्तरावर घेण्यात याव्या. अंगणवाडी केंद्रावर विद्युत मीटर उपलब्ध करणे संदर्भाने संबंधित विभागास पत्र व्यवहार करण्यात यावा. सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची एक रकमी पेंशन संदर्भाने तातडीने कार्यवाही करण्यात यावी. अंगणवाडी केंद्रात नळ योजनेअन्वये छतावर पाण्याची टाकी उपलब्ध करणे संदर्भाने संबंधित विभागास पत्र व्यवहार करण्यात यावा. कास्ट्राईब कर्मचारी महासंघासोबत झालेल्या चर्चेची कार्योत्तर प्रत महासंघास अविलंब देण्यात यावी. या वेळी सर्व समस्या प्राधान्याने निकाली काढणार, याबाबत बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी आश्वस्त केले.या वेळी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ गोंदियाचे जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश वासनिक, जिल्हा संघटिका शिवा वासनिक, सदस्य‌ पुष्पा उईके व अन्य उपस्थित होते.

blank