
गोंदिया,दि.04 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून आज 04 मार्च रोजी प्राप्त अहवालात जिल्ह्यात नवे 312 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.88 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी औषधोपचारातून कोरोनावर मात केल्याने त्यांना आज सुट्टी देण्यात आली. आजपर्यंत 17004 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. 15329 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. क्रियाशील असलेल्या जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 1483 आहे. 878 क्रियाशील असलेले बाधित रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 192 रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण आजारातून बरे होण्याचे प्रमाण 91 टक्के आहे. बाधित रुग्णांचा मृत्यू दर 1.1 टक्के आहे तर डब्लिंग रेट 380.2 दिवस आहे. जिल्हयातील डीसीएच रुग्णालयात 141 खाटा सध्या उपलब्ध असून 29 रुग्ण भरती आहेत. मध्यप्रदेशातील दोन रुग्ण गोंदिया जिल्ह्यातील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
भंडारा जिल्ह्यात आज 844 व्यक्ती कोरोना पॉझिटिव
भंडारा, दि.4:- जिल्ह्यात आज 243 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 15530 झाली असून आज 844 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 20861 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 74.44 टक्के आहे.आज 6746 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 844 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आतापर्यंत 2 लाख 1 हजार 64 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 20861 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील362, मोहाडी 142, तुमसर 73, पवनी 116, लाखनी 79, साकोली 31 व लाखांदुर तालुक्यातील 41 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 15530 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 20861 झाली असून 4979 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या 01 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 352 झाली आहे.
वाशिम जिल्ह्यात आणखी २३४ कोरोना बाधित
वाशिम शहरातील सुंदरवाटिका येथील १, देवपेठ येथील १, ड्रीमलँड सिटी येथील १, सिव्हील हॉस्पिटल परिसरातील १, सुदर्शन नगर येथील २, पोलीस वसाहत येथील १, अल्लाडा प्लॉट येथील १, रिसोड नाका येथील २, नंदीपेठ येथील १, नवोदय विद्यालय परिसरातील ३, बाहेती हॉस्पिटल परिसरातील २, लाईफ लाईन हॉस्पिटल परिसरातील ६, पाटणी चौक येथील १, नवीन आययुडीपी कॉलनी येथील १, सिव्हील लाईन्स येथील १, लाखाळा येथील २, चंडिका वेस येथील १, शुक्रवार पेठ येथील १, काळे फाईल येथील १, पुसद नाका येथील १, आययुडीपी कॉलनी येथील ३, नालसापुरा येथील १, प्रशासकीय इमारत परिसरातील १, योजना पार्क येथील १, गुरुवार बाजार येथील १, टिळक चौक येथील १, पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे ११, हिवरा रोहिला येथील ८, उकळीपेन येथील १५, सुरकुंडी येथील १, पंचाळा येथील २, काटा येथील १, दुधाळा येथील १, कळंबा महाली येथील १, कोकलगाव येथील १, तोंडगाव येथील १, कोंडाळा झामरे येथील १, रिसोड शहरातील तहसील कार्यालय परिसरातील ५, सिटी केअर हॉस्पिटल परिसरातील १, बेंदरवाडी येथील २, शहरातील इतर ठिकाणचे ६, मोठेगाव येथील ५, चिखली येथील २, नावली येथील ४, वाघी येथील १, गोवर्धन येथील ४, मांगूळ येथील १, महागाव येथील १, बिबखेडा येथील २, मोप येथील १, नेतान्सा येथील १, आंचळ येथील १२, वरखेडा येथील ४, नंधाना येथील १, मालेगाव शहरातील गांधी चौक येथील १, सिध्देश्वर कॉलनी येथील १, गोकुळधाम येथील २, शहरातील इतर ठिकाणचे ११, राजुरा येथील १, पांगरी नवघरे येथील २, मुसळवाडी येथील १, वरदरी येथील १, किन्हीराजा येथील १, नागरतास येथील १, झोडगा येथील २, मंगरूळपीर शहरातील महेश नगर येथील ३, सुभाष चौक येथील १, माळीपुरा येथील १, अशोक नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ३, चिंचोली येथील १, आसेगाव येथील १, गणेशपूर येथील १, नवीन सोनखास येथील ४, धानोरा येथील १, शहापूर येथील २, पोटी येथील १, चांदई येथील १, मोहरी येथील १, जोगलदरी येथील २, बिटोडा येथील १, रामसिंगवाडी येथील २, मानोली येथील १, कारंजा शहरातील रमाई कॉलनी येथील १, शिक्षक कॉलनी येथील २, शितलामाता परिसरातील २, बायपास परिसरातील १, शासकीय विश्रामगृह परिसरातील १, शिंदे कॉलनी येथील १, सुदर्शन कॉलनी येथील १, इंदिरा नगर येथील १, प्रगती नगर येथील १, संतोषी माता कॉलनी येथील २, शहरातील इतर ठिकाणचा १, शहा येथील १, वडगाव रेंगे येथील १, कामरगाव येथील १, पोहा येथील १, कामठवाडा येथील १, मेंद्रा येथील १, कुपटी येथील १, पिंप्री फॉरेस्ट येथील १, मानोरा तालुक्यातील भुली येथील २, साखरडोह येथील ३, वसंत नगर येथील २, वाघोली येथील १, गिर्डा येथील १, सोमठाणा येथील १, वातोड येथील ५, गादेगाव येथील १, अजनी येथील ३, गव्हा येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील ४ बाधितांची नोंद झाली असून ३७६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, उपचारा दरम्यान आणखी तीन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.
दोन मृत्यूसह आज 111 नवीन कोरोना बाधित तर 68 कोरोनामुक्त
गडचिरोली,दि.04: आज जिल्हयात 111 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 68 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 10977 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 10268 वर पोहचली. तसेच सद्या 576 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 115 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज दोन नवीन मृत्यूमध्ये आलापल्ली येथील 60 वर्षीय महिलेचा तर दुसऱ्या मृत व्यक्ति मध्ये गडचिरोली येथील 77 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.71 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 5. 25 टक्के तर मृत्यू दर 1.05 टक्के झाला.
नवीन 111 बाधितांमध्ये गडचिरोलीतील 46, अहेरी 10, आरमोरी 2, भामरागड तालुक्यातील 20, चामोर्शी 8, धानोरा तालुक्यातील 1, कोरची 2, कुरखेडा 03, मुलचेरा 1, सिरोंचा 3, तर वडसा तालुक्यातील 15 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 68 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 42, अहेरी 8, आरमोरी 4, भामरागड 1, चामोर्शी 3, धानोरा 1, एटापल्ली 1, सिरोंचा 1, कुरखेडा 3, तर वडसा मधील 4 जणांचा समावेश आहे.नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील बाधितामध्ये नवेगाव 10, शिवाजीनगर 1, कारगिर चौक 1, ओमनगर 1, लांजेडा 6, त्रिमुर्ती चौक 1, कॉम्पलेक्स 2, रामनगर 2, झेडपी क्वॉर्टर 1, जेप्रा 1, चामोर्शी रोड 2, वसा 2, गोकुलनगर 2, गोगांव 1, आंबेशिवनी 1, शाहुनगर 1, मेडिकल कॉलनी 2, आशिर्वादनगर 1, सिआरपीएफ कॅम्प 1, होंडा शोरुमजवळ 1, लक्ष्मीनगर 1, हनुमान वार्ड 1, स्थानिक 1, राजगट्टा 1, बोदली 1, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये नागेपल्ली 4, आलापल्ली 3, स्थानिक 2, महागांव 1, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 2, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 3, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये भवानीपूर 1, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 4, घारगांव 1, रेगडी 3, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, पोलीस कॅम्प कोटगुल 1, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 13, एलबीपी हेमलकसा 6, झारेगुडा 1, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये सुधागुडम 1, नेमाडा 2, तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये एम जी विद्यालय 1, स्थानिक 4, गांधी वार्ड 1, सिंधी कॉलनी 1, कुरुड 3, आमगांव 4, विसोरा 1, तर इतर जिल्हयातील बाधितामध्ये 1 जणांचा समावेश आहे.
अमरावती रवीवार अहवाल
आज पॉझिटिव्ह : 303
एकूण पॉझिटिव्ह : 49,826
आज मृत्यु : 1
एकूण मृत्यु : 687
एकूण डिस्चार्ज : 46,57
आज डिस्चार्ज : 513
एकूण दाखल : 3082
अमरावती कोव्हिड : 826
नागपूर : 7
गृहविलगीकरण : 2256





