37.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ तिरोडा तालुक्यातील शेतकरी करताहेत अझोला शेती – अदानी फाउंडेशन चा पुढाकार

तिरोडा तालुक्यातील शेतकरी करताहेत अझोला शेती – अदानी फाउंडेशन चा पुढाकार

0
69

blank

तिरोडा,दि.05ः अदानी फाउंडेशन तिरोडा मार्फत तालुक्यातील 26 गावांमध्ये कामधेनू प्रकल्प राबविला जातो या प्रकल्पाअंतर्गत पशुपालकांना मोफत कृत्रिम रेतन,गर्भ परीक्षण, वांझपण निवारण, चारा प्रात्यक्षिक इत्यादी सुविधा थेट त्यांच्या दारापर्यंत पुरविल्या जातात या प्रकल्पाचा उद्देश मुख्यत्वे पशुपालकांच्या उत्पन्नात वाढ करणे व देशी गोवंशाचा विकास करणे हा आहे प्रकल्पाचा एक भाग म्हणून चालू सत्र 2020 – 21 मध्ये अदानी पावर प्रमुख कांती बिश्वास यांच्या मार्गदर्शनाखाली 12 गावातील 28 पशुपालकांना अझोला शेती करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले व या अंतर्गत मोफत अझोला कल्चर, ग्रीन मॅट, प्लास्टिक, मिनरल मिक्स्चर, व खत वाटप करण्यात आले.
यामुळे पशुपालकांना जनावरां साठी मोफत दर्जेदार चारा उपलब्ध झाल्याने त्यांचा पशुखाद्याचा खर्च वाचला तसेच दुग्ध उत्पादनात सुद्धा 10 ते 15 टक्के वाढ झाली.
या कार्यक्रमाची यशस्विता बघता अदानी फाउंडेशन हेड नितीन शिराळकर यांनी अझोला शेतीचे महत्त्व सांगताना अझोला ही वनस्पती शेवाळ या प्रकारात मोडते या वनस्पतीमध्ये प्रथिने, विटामिन्स,तसेच क्षार तत्वे मुबलक प्रमाणात आढळतात. अझोला वनस्पतीचे उत्पादन घेण्यासाठी सावलीत 2*2*2 फूट आकाराचा खड्डा करून या खड्ड्यावर प्लॅस्टिकच्या आवरणाने आच्छादन करावे. त्यानंतर 10 ते 15 किलो माती त्याच्यावर पसरून घ्यावी. त्याच बरोबर गाईचे शेण 2 किलो व 30 ग्रॅम सुपर फास्फेट 10 लिटर पाण्यात मिसळावे व हे मिश्रण खड्ड्यामध्ये टाकावे अशा मिश्रणात ताजे पाणी 10 सेमी उंचीपर्यंत टाकावे नंतर 500 ग्रॅम ते 1 किलो ताजे व स्वच्छ अझोला कल्चर टाकावे. अशाप्रकारे तयार केलेल्या खड्ड्यात अझोला वनस्पती वेगाने वाढते व खड्डा 10 ते 15 दिवसात वनस्पतीने भरून जातो. येणाऱ्या वर्षांमध्ये जास्तीत जास्त पशुपालकांना अझोला शेती करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येईल असे सांगितले. उपक्रम यशस्वी करण्यासाठी अदानी फाउंडेशनचे मिनेश कटरे तसेच अंमलबजावणी यंत्रणा बायफचे रुपेश कुकडे, सुमित बोरकर, गौरीशंकर अंबुले,व मनोज डोमळे यांनी परिश्रम घेतले.

blank