37.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home गुन्हेवार्ता विना मास्क वावरणाऱ्यावर काळीपिवळी चालकाविरुद्ध डुग्गीपार पोलीसांची कारवाई

विना मास्क वावरणाऱ्यावर काळीपिवळी चालकाविरुद्ध डुग्गीपार पोलीसांची कारवाई

0
40

blank

कोसमतोंडी:-(महेंद्र टेंभरे):-राज्यात पुन्हा कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव वाढत असल्याने कोरोनाचा उद्रेक वाढू नये, सुरक्षाविषयक उपाययोजना यांची अंमलबजावणी नागरिकांनी करावी याकरिता पोलीस स्टेशन डुग्गीपार येथील पोलिस निरतंर लोकांना माहिती देत आहेत तरी नागरिक याकडे दुर्लक्ष करून नियमाचे उल्लंघन करीत असल्याने डुग्गीपार पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन वांगडे व पोलीस स्टाॅप यांनी दि.५ एप्रिलला शेंडा चौक सडक अर्जुनी व कोहमारा चौक येथे विशेष मोहीम राबवून विना मास्क वावरणाऱ्या ३१ ईसमावर कार्यवाही करून १५५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आले.तसेच सोशल डिस्टन्टींगचे पालन न करून काळी पिवळी वाहनात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवून नेणा-या दोन काळी पिवळी चालकाविरुद्ध कलम १८८,२६९,२७०भादंवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आले.विनाकारण घराबाहेर पडू नये व निघतांना मास्क घालूनच निघावे.कोविड-१९ संबंधित नियमाचे पालन करण्याबाबत डुग्गीपार पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन वांगडे यांनी आवाहन केले.सदर कारवाई पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, पोलीस हवालदार जगदेश्वर बिसेन,चालक पोहवा रमेश हलामी,नापोशि झुमन वाढई, जगदिश मेश्राम, मनोहर गावडकर, सचिन गेडाम, सुरेश चंद्रिकापुरे आणि मपोशि रागिणी निखारे पोलीस स्टेशन डुग्गीपार यांनी केली.

blank