38.6 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ रेल्वे व बस स्थानकात प्रवाशांची तपासणी करा – जिल्हाधिकारी

रेल्वे व बस स्थानकात प्रवाशांची तपासणी करा – जिल्हाधिकारी

0
53

blank

गोंदिया, दि.6 : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग तीव्रतेने वाढत असल्यामुळे जिल्ह्यात अनेक
ठिकाणी प्रतिबंधीत क्षेत्र व हॉटस्पॉट निर्माण झाले आहेत. त्यामुळे रेल्वे व बसेसच्या माध्यमातून
जिल्ह्यात येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला असून रेल्वे व
बस्थानकात येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांच्या शरीराचे तापमान मोजणे तसेच ऑक्सीजन लेव्हलची
तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी  यांनी दिले.
6 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग
रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेताना आयोजित सभेत जिल्हाधिकारी बोलत
होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिपकुमार डांगे, पोलीस अधीक्षक विश्व
पानसरे, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे यांची प्रामुख्याने
उपस्थिती होती.
सदर बैठकीमध्ये रेल्वे व आगार येथील कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाचा
प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेऊन या दोन्ही ठिकाणी RTPCR तपासणी करुन घेण्याचे निर्देश
जिल्हाधिकारी यांनी संबंधीत विभागाला दिले. तसेच रेल्वे व आगार या ठिकाणी आत येण्याचे व बाहेर
जाण्याचे दारावर प्रवाशांच्या तपासणीकरीता वैद्यकीय चमू नियुक्त करुन ज्या प्रवाशांना ताप किंवा
आजार आहे अशा प्रवाशांची तात्काळ RAT ॲन्टीजेन तपासणी करणे तसेच आवश्यक असल्यास
RTPCR तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले.
गोंदिया जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्यामुळे
जिल्ह्यात तयार करण्यात आलेले C.C.C. (कोविड केअर सेंटर) मध्ये नियमीत पाहणी व नियंत्रण
ठेवण्याकरीता नोडल अधिकारी नियुक्त करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले.
गोंदिया येथील रेल्वे कॉलनीत हॉटस्पॉट सापडलेले आहे, त्यामुळे रेल्वे कॉलनीत कॅम्प
लावण्यात यावे. तसेच रॅन्डम सॅम्पलींग सुरु करण्यात यावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सभेला नगरपरिषद मुख्याधिकारी करण चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे
अधिष्ठाता डॉ.नरेश तिरपुडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एस.बी.पांचाल, आपत्ती
व्यवस्क्थापन अधिकारी राजन चौबे, आगार व्यवस्थापक संजना पटले, कार्यकारी अभियंता (PWD) क्र.1
चे श्री खोब्रागडे, कार्यकारी अभियंता (PWD) क्र.2 चे अब्दुल जावेद व रेल्वे स्टेशन मास्तर उपस्थित होते.

blank