
जिल्ह्यात आज 199 रुग्णांना डिस्चार्ज
• बरे झालेले रुग्ण 16012
• पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या 22385
• क्रियाशील रुग्ण 6004
• एकूण मृत्यू 369
• रिकव्हरी रेट 71.53 टक्के
• मृत्यू दर 01.65
• आजच्या टेस्ट 5922
भंडारा, दि.6 :- जिल्ह्यात आज 199 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 16012 झाली असून आज 868 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 22385 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 71.53 टक्के आहे. तर जिल्ह्याचा कोरोना रुग्ण मृत्यू दर 01.65 आहे.
आज 5922 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 868 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आतापर्यंत 2 लाख 9 हजार 481 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 22385 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.
जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 369, मोहाडी 110, तुमसर 95, पवनी 93, लाखनी 98, साकोली 66 व लाखांदुर तालुक्यातील 37 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 16012 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची संख्या 22385 झाली असून 6004 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या 08 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 369 झाली आहे.





