29.7 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home गुन्हेवार्ता कालव्यात दुचाकीसह शेतकरी पडला

कालव्यात दुचाकीसह शेतकरी पडला

0
52

blank

अर्जुनी मोरगाव– तालुक्यातील इटखेडा येथील युवक शेतात कालव्यातून पाणी देण्याकरीता गेला असता आपल्या दुचाकीसह कालव्यात पडल्याने वाहून गेल्याची घटना आज मंगळवारला घडली.सदर युवक शेतकर्याचे नाव पांडुरंग बळीराम मडावी असे आहे.मडावी हे महालगाव येथील शेतीला पाणी देण्यासाठी
गाडी क्रमांक एम एच 35 एन 5845 ने इटियाडोह कालव्याच्या मुख्य कालव्याने शेताकडे जात असताना दुचाकीवरील नियंत्रण गेल्याने गाडीसह पांडुरंग कालव्याच्या प्रवाहात वाहून गेला.घटनेची माहिती मिळताच बीटअंमलदार ज्ञानेश्वर बोरकर यांनी घटनास्थळ गाठून वाहन कालव्यातून बाहेर काढले,मात्र पांडूरंगचा शोध लागलेला नव्हता.अर्जुनी मोरगाव पोलीस पांडुरंगचा कालव्यात शोध घेत आहेत.घटनास्थळी अर्जुनी-मोर तहसीलदार विनोद मेश्राम,व पोलिस स्टेशनचे ठाणेदार महादेव तोंडले यांनी भेट देऊन पाहणी केली.कालव्यातील पाण्याचा प्रवाह कमी करण्यास कळविण्यात आले आहे. तपास बीट अंमलदार ज्ञानेश्वर बोरकर व प्रशांत बोरकर करीत आहेत.

blank