37.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ कोरोनाने घेतला ग्रामसेवकाचा बळी

कोरोनाने घेतला ग्रामसेवकाचा बळी

0
152

blank

कुरखेडा,दि.10ः- तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी, नक्षलग्रस्त व अविकसित भागात मागील दहा वर्षे सेवा देणारे ग्रामसेवक अरुण महादेव कोडाप (४९) यांचे शुक्रवारी पहाटे पाच वाजता घरी निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर चाचणी करण्यात आली असता ते कोरोनाबाधित आढळून आले.
कोडाप हे अत्यंत साधेपणाने जीवन जगणारे व्यक्तीमत्व होते. त्यांचे मुळ गाव देसाईगंज असुन एका सुशिक्षित घरात त्यांची जडणघडण झाली. वडील पेशाने शिक्षक होते. त्यांचे पश्‍चात दोन मुली, पत्नी, आई नातलग असा मोठा परिवार आहे. स्व. कोडाप यांनी कुरखेडा तालुक्यातील अतिदुर्गम भागात सेवा दिलेली आहे. कातलवाडा व खोब्रामेंढा या ठिकाणी ग्रामसेवक म्हणून पदभार सांभाळला. त्यांच्या सेवेला वीस एकवीस वर्षे पूर्ण झालीत. मागिल दोन दिवसांपासून त्यांना दम्याचा त्रास जाणवत होता. मृत्यूपश्‍चात कोरोना तपासणी केली असता ती कोरोना सकारात्मक दिसून आली. घरातील एक मुलगी वगळता इतर सदस्य सुध्दा बाधित आढळल्याबाबत माहिती समोर आली आहे. कोरोनाची दाहकता हळूहळू तालुक्यात जोर धरत आहे. तरी नागरिकांना वेळीच सावध होण्याची गरज आहे.

blank