43.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home गुन्हेवार्ता नक्षल्यांचा टिपागड डिव्हिसी किशोर कवडो व समर्थक गणपत कोल्हे पोलीसांच्या तावडीत

नक्षल्यांचा टिपागड डिव्हिसी किशोर कवडो व समर्थक गणपत कोल्हे पोलीसांच्या तावडीत

0
62

blank

गडचिरोली,दि.11 एप्रिल – जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात 29 मार्च रोजी खोब्रामेंढा-हेटाळकसा येथे झालेल्या पोलीस-नक्षल चकमकीमध्ये जखमी झालेल्या नक्षलवादी टिपागड डिव्हिसी किशोर ऊर्फ गोंगलु ऊर्फ सोबु घिसु कवडो (वय 38)  रा. रामनटोला ता. एटापल्ली यास पकडण्यात  उपविभागीय पोलीस अधिकारी धानोरा व पोमके कटेझरीच्या पोलीस पथकाला यश आले आहे. खोब्रामेंढा चकमकीदरम्यान त्यास बंदुकीची गोळी लागल्याने तो जखमी अवस्थेत पडून होता. पोलीस पथकाने त्याला पकडल्यानंतर रुग्णालयात दाखल केले असुन, रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया होवुन त्यांची प्रकृती आता व्यवस्थित असल्याची माहिती पोलील अधिक्षक अंकित गोयल यांनी दिली आहे. 

त्याच्यावर चकमक, खून, जाळपोळ अशा अनेक गुन्हयात सहभाग असल्यामुळे गडचिरोली पोलीस पुढील कारवाई करणार आहे. त्यासोबतच गडचिरोली पोलीस दलाच्या विरोधात विघातक कृत्य करणाऱ्या नक्षलवाद्यांना व जखमी नक्षल कमांडर किशोर कवडोस मदत करणारा नक्षल समर्थक गणपत कोल्हेला देखील गडचिरोली पोलीस दलाने अटक केली.  पोलीस अधीक्षक अंकित गोयल  यांनी नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांना आळा घालण्यासाठी नक्षलविरोधी अभियान तीव्र केले असुन, नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.

blank