37.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ रेमडीसिव्हीर इंजेक्शन साठी “पॅनिक” होऊ नका- डॉ. डोकरीमारेंचे आवाहन

रेमडीसिव्हीर इंजेक्शन साठी “पॅनिक” होऊ नका- डॉ. डोकरीमारेंचे आवाहन

0
47

blank

भंडारा-सध्या कोरोना बाधित रुग्णांची नातेवाईक औषधाच्या दुकानांमध्ये रेमडीसिव्हीर इंजेक्शन मिळावे म्हणून एकच गर्दी करीत आहेत. इंजेक्शन मिळत नसल्याने व्यथीत होणाऱ्या नातेवाईकांची प्रचंड निराशा होत असतानाच आता या इंजेक्शन वर फार अवलंबून राहू नका, जागतिक आरोग्य संघटनेच्या नुसार हे इंजेक्शन कोरोना बरा करण्यासाठी फारसे प्रभावी किंवा परिणामकारक नसल्याचे स्वतः जिल्हा सामान्य रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निखिल डोकरीमारे यांनी स्पष्ट केले आहे.

सध्या कोरोनाने उग्र रुप धारण केले आहे. प्रादुर्भाव प्रचंड वाढला असून घराघरापर्यंत हा संसर्ग पोहोचला आहे. अशा परिस्थिती प्रतिबंधात्मक म्हणून ज्या ज्या गोष्टी करता येतील त्या साठी रुग्ण आणि त्यांचे नातेवाईकांची धडपड सुरू आहे. सध्या रेमडीसिव्हीर इंजेक्शन साठी प्रचंड मारामार सुरू असून वाटेल त्या किमतीत ते खरेदी करणे लोक तयार आहे. परंतु या इंजेक्शन चा सत्या तुटवडा असल्याने लोक भयभीत झाले आहेत. कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी इंजेक्शन हाच जालीम इलाज असल्याचे लोकांच्या मनावर बिंबवल्या गेल्याने आणि खाजगी रुग्णालयांकडून नाही यावर अधिक भर दिला जात असल्याने लोकांची द्विधा मनस्थिती झाली आहे. आज मिळेल त्या किमतीला इंजेक्शन देण्यासाठी तयार असलेल्या लोकांना ते मिळत नाही. तासन्तास दुकानासमोर उभे राहून इंजेक्शन मिळावे म्हणून लोक प्रयत्न करताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर खरंच इंजेक्शन कोरोना आजार बरा करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे का, हे जाणून घेण्याच्या दृष्टीने जिल्हा सामान्य रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर निखिल डोकरीमारे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी इंजेक्शन च्या मागे लागून भयभीत होऊ नका असे आवाहन लोकांना केले.

आज सर्व खासगी आणि शासकीय रुग्णालये रुग्णांनी भरलेली आहेत. अनेक जण भीतीने काहीही लक्ष नसताना रुग्णालयात दाखल होत आहेत. त्यामुळे बरेचदा खऱ्या गरजू रुग्णांना खाटा उपलब्ध होत नाही.त्यामुळे आवश्यकता असेल तरच रुग्णालयात भरती होण्याचे आवाहन त्यांनी केले. रेमडीसिव्हीर इंजेक्शनच्या नावाने जो गोंधळ सध्या सुरू आहे, तो काही अंशी मनात निर्माण झालेल्या भीतीमुळे आहे. प्राणवायू ची पातळी 90 च्या खाली गेलेल्यांना प्राणवायू लागेल मात्र रेमडीसिव्हीर इंजेक्शनची गरज भासत नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या दिशा निर्देशानुसार कोरोना व्यवस्थापनात म्हणजेच नियंत्रणात आणण्यामध्ये रेमडीसिव्हीर ची भूमिका महत्वाची नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचा प्रभाव आणि परिणाम फारसा नसल्याचे स्पष्ट करण्यात आले असल्याने इंजेक्शन मिळवण्यासाठी धावपळ किंवा मनस्ताप करून घेऊ नका असे आवाहन डॉक्टर डोकीवर यांनी केले. इंजेक्शन लावले नाही तर धोका होईल ही भीती मनातून काढून टाका व लक्षणे असल्यास गोळ्या आणि इतर औषधोपचार घेऊन आजार बरा करा असे आवाहनही डॉक्टर डोकरीमारे यांनी केले आहे.

blank