
सडक अर्जुनी-नगर पंचायत कार्यालय सडक अजुर्नी येथे कोरोना संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. सदर बैठकीत अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चांद्रिकपुरे, उप विभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, मुख्याधिकारी डॉ. विवेक मेश्राम, नायब तहसीलदार खोकले, तालुका आरोग्य अधिकारी हर्षवर्धन मेश्राम, माजी नगराध्यक्ष देवचंद तरोने तसेच इतर विभागाचे प्रमुख व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना आ.मनोहर चंद्रिकापुरे यांनी नगरपंचायत क्षेत्रातील कोरोना रूग्णसंख्या व परिसरातील रुग्णांत होणारी वाढ चिंता वाढविणारी असून त्यावर त्वरित पायबंध द्यालण्यासाठी राज्य शासनाने घालून दिलेले निर्बधाची प्रभावी अंमलबजावींनी करावी, असे निर्देश आ. मनोहर चंद्रिकपुरे यांनी दिले. या शिवाय नगर पंचायत मधील विविध नागरिसुविधाचा आढावा घेऊन, आवश्यक सुविधाचे नियोजन आराखडा तयार करुण त्यास शासनाकडून उपलब्ध होणार्या निधितुन निर्माण कार्य करावे, नगर पंचायत क्षेत्रात रोहयोचे कामचे नियोजन करुन त्यास जिल्हाधिकारी व संचालक नगर प्रशासन मुंबई यांचे मार्फत शासनाचे रोजगार हमी योजना विभागाकडे पाठवावे जेणे करून त्यासाठी निधी प्राप्त करता येईल व नगरपंचायत क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात विकासाची कामे हाती घेता येतील. त्या मार्फत मजुरांना काम मिळेल असे मार्गदर्शन आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी केले. त्या शिवाय पाणी टंचाई विचारात घेता आमदार निधीतून दोन विंधण विहिरी मंजूर झाल्या आहेत त्या लवकरच कार्यमित करण्यात येतील असे सांगितले.
नगरपंचायत क्षेत्रातील घन कचरा गोळा करण्यासाठी नगर पंचायत खरेदी केलेल्या घन कचरा गाडीचे लोकार्पण व दिव्यांगांना आर्थिक मदतीचे धनादेश वितरण आमदार यांच्या हस्ते धनादेश करण्यात आला.





