33.9 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ भंडारा जिल्ह्यात हजारावर रुग्ण डिस्चार्ज

भंडारा जिल्ह्यात हजारावर रुग्ण डिस्चार्ज

0
22

भंडारा, दि.18 :- जिल्ह्यात आज 1040 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 24193 झाली असून आज 1244 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 37599 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 64.34 टक्के आहे.

 आज 4348 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 1244 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आतापर्यंत 2 लाख 90 हजार 967 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 37599 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.

 जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 547, मोहाडी 76, तुमसर 124, पवनी 97, लाखनी 182, साकोली 141 व लाखांदुर तालुक्यातील 77 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 24193 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबाधितांची संख्या 37599 झाली असून 12847 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या 26 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 559 झाली आहे.

 रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 64.34 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 01.48 टक्के एवढा आहे.

शासकीय व खाजगी रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णांची कोविड चाचणी प्रिस्क्राईब करावी असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.

नागरिकांना आवाहन

  • कोवीडपासून बचावासाठी मास्क हा आपला मुख्य संरक्षक आहे,मास्कचा सदैव आणि योग्य वापर करा.
  • साबण आणि पाण्याने हात वारंवार कमीत-कमी 20 सेकंद व्यवस्थित धुवा.
  • साबण आणि पाण्याची सुविधा उपलब्ध नसेल तर अल्कोहोलयुक्त हॅंड सॅनिटायझरचा वापर करा.
  • कोरोना पॉझिटिव्ह 1244
  • बरे झालेले रुग्ण 24193
  • एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 37599
  • क्रियाशील रुग्ण 12847
  • आज 26 मृत्यू
  • एकूण मृत्यू 559
  • रिकव्हरी रेट 64.34 टक्के
  • मृत्यू दर 01.48
  • आजच्या टेस्ट 4348

blank