40.3 C
Gondiā
Saturday, June 13, 2026
Home गुन्हेवार्ता अवघ्या बारा तासात खुनाचे आरोपी जेरबंद

अवघ्या बारा तासात खुनाचे आरोपी जेरबंद

0
86

blank

डुग्गीपार पोलिसांची कार्यवाही

कोसमतोंडी,दि.6 (महेंद्र टेंभरे):- काल बुधवारी सावंगी तिडका रोड लगत अनैतिक संबंधातून घडलेल्या एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना अवघ्या बारा तासात जेरबंद करण्याची यशस्वी कार्यवाही डुग्गीपार पोलिसांनी केली.

सविस्तर असे की. काल ५ मे रोजी पोलिस स्टेशन डुग्गीपार अंतर्गत सावंगी ते तिडका रोड लगत अज्ञात इसम मृतावस्थेत असल्याची माहिती सावंगीचे पोलिस पाटील यांनी डुग्गीपार पोलिसांना दिली. या माहितीवरून पोलिस निरीक्षक सचिन वांगडे आपल्या चमूसह घटनास्थळी रवाना झाले. तिथे गेल्यावर मृत इसम दुर्गेश सावलदास लोले( वय ३२ वर्षे )रा. सडक अर्जुनी असे असल्याचे समजले. मृत दुर्गेशच्या डोक्याच्या पाठीमागील बाजूस जड वस्तूने प्रहार करून मारल्याचे तपासाच दिसून आले. अधिक चौकशी केली असता दुर्गेशचे कोहमारा येथील शारदा राऊत हिची मुलगी अस्मिता बडोले हिचे सोबत गेल्या पाच वर्षांपासून अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. पोलिसांनी शारदा राऊत हिला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता तिने उडवाउडवीचे उत्तरे दिली. पोलिसांचा संशय बळावल्याने शारदाची मुलगी अस्मिता संतोष बडोले, जावई संतोष बडोलेसह विशाल राऊत यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता संतोष बडोले याने दुर्गेशचे त्याची पत्नी अस्मितासोबत अनैतिक संबंध असल्याने ४ मे च्या रात्री १० वाजेदरम्यान त्यांचे डोक्यावर सब्बलने प्रहार करून खुन केल्याची कबुली दिली. आरोपी संतोषने विशाल राऊतच्या मदतीने दुर्गेशचा मृतदेह सावंगी तिडका रोडचे झुडपामध्ये फेकला. घटनास्थळावरील गुन्हातील पुरावा नष्ट करण्याकामी अस्मिता हिने संतोष आणि विशालची मदत केली.

युदधराज सावलदास लोले रा. सडक अर्जुनी यांचे फिर्यादीवरून डुग्गीपार पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक विश्व पानसरे आणि पोलिस उपविभागीय अधिकारी जालंधर नालकुल यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक सचिन वांगडे, हरिश्चंद्र शेंडे. रमेश हलामी, झुमन वाणी,जगदेश्वर बिसेन,मनोहर गावडकर,उत्तम दहीवले, सुनील डहाके,रागिणी निखारे करीत आहेत.