गोंदिया/तिरोडा- गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी आपल्या स्थानिक निधीतून रुग्णवाहिकेचे साठी निधी उपलब्ध करून दिला. सदर रुग्णवाहिकेचे 7 मे रोजी लोकार्पण करण्यात आले. या रुग्णवाहिकेत बेसिक लाईफ सपोर्ट ची संपूर्ण सुविधा उपलब्ध केलेली आहे. यामध्ये ऑटोमॅटिक एक्स्टर्नल डीफॅब्रिलेटर, रक्तदाब तपासणी यंत्र, पल्स ऑक्सीमिटर, ऑक्सीजन सिलेंडर व इतर नवीन तांत्रिक बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे. ही रुग्णवाहिका 102 आणि 108 अशा दोन्ही आपत्कालीन सेवेसाठी उपलब्ध राहणार आहे. विशेष म्हणजे ग्रामीण क्षेत्रातून केटीएस आणि गंगाबाई रुग्णालय येथे येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. अशात ही रुग्णवाहिका ग्रामीण क्षेत्रातील नागरिकांकरिता आरोग्यवर्धिनी ठरणार आहे.
अद्ययावत सुविधायुक्त रुग्णवाहिका आरोग्य सेवेत– आ. रहांगडाले यांचा पुढाकार
तिरोडा – कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे. अशात आरोग्य सुविध कमी पडत आहेत. गंंभीर रुग्णांना वेळीच उपचार मिळून त्यांचे प्राण वाचविता यावे, हा उदात्त हेतू राखून स्थानिक आमदार विजय रहांगडाले यांनी त्यांच्या आमदार निधीतून 25 लाख रुपये किमतीची अद्ययावत सुविधायुक्त रुग्णवाहीका येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या सेवेत उपलब्ध करून दिली. या रुग्णवाहिकेचे लोकार्पण आज 8 मे रोजी करण्यात आाले. तिरोडा तालुक्यात आरोग्य सेवेकरिता रुग्णवाहिका उपलब्ध झाल्याने या सेवेचा निश्चितच रुग्णांना लाभ मिळणार आहे.