35.7 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home राजकीय चौकशी समिती गठीत करा अन्यथा आमरण उपोषण

चौकशी समिती गठीत करा अन्यथा आमरण उपोषण

0
29

blank

मुंबई दि.13 (प्रतिनिधी) अंधेरी एमआयडीसी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत विकासक, काही भ्रष्ट अधिकारी व दलालमार्फत 10 हजार कोटींच्या भ्रष्टाचार झाला असून सेवानिवृत्त न्यायधीशां मार्फत चौकशी करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर यांनी केलीं आहे.

विमल शहा आकृती / हब टाऊन विकासक आणि खोट्या जातीच्या दाखल्यावर मतदार, निवडणूक आयोग व प्रशासनची दिशाभूल करून निवडून येऊन नंतर मा. उच्चन्यायालयाने नगरसेवक पद रद्दबातल ठरविलेल्या  मुरजी पटेल यांनी तत्कालीन एमआयडीसीचे भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून अंदाजे10 हजार कोटी रुपयांच्यावर घोटाला केला आहे.

आजही शेकडो झोपडी धारक स्वतःच्या मालकीचे घरे तोडून देऊनही प्रकल्पाच्या लाभापासून वंचित आहेत, २० वर्ष होऊन गेले सदनिका नाही ना भाडे धनादेश नाही. विकासक एफएसआय च्या इमारतीला ओसी मिळवून ऑफिस व बस्तान घेऊन पलायन केले आहे.

विकासक विमल शहा, नगरसेवक मुरजी पटेल व त्या-त्या वेळचे भ्रष्ट अधिकारी यांची वंशावळ चौकशी करावी व सदनिकेपासून वंचितांना लाभ मिळवून दयावा अशी मागणी डॉ. राजन माकणीकर व राज्य महासचिव श्रवण गायकवाड यांनी केली आहे अन्यथा राजभवन समोर डॉ राजन माकणीकर आमरण उपोषण करतील असा इशारा निवेदनामार्फत मुंबई  पोलीस आयुक्त व राज्यपालांना दिला आहे.

blank