32.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home गुन्हेवार्ता मासे पकडण्याच्या नादात युवकाने गमावला जीव

मासे पकडण्याच्या नादात युवकाने गमावला जीव

0
33

blank

नदीकाठी लावलेल्या वीजप्रवाहने युवकाचा मृत्यू

देवरी,दि.15:- येथून सात किलोमीटर अंतरावरील भोयरटोला (शिलापूर)  नदीकाठावर मासे पकडण्यासाठी गेलेल्या एका 38 वर्षीय युवकाचा विजेचा धक्का गालल्याने मृत्यू झाल्याची घटना काल (दि.14) रोजी सकाळी साडे 9 च्या सुमारास घडली. या घटनेची नोंद देवरी पोलिसात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

मृताचे नाव विलास जीवन वट्टी (वय 38) राहणार भोयरटोला शिलापूर असे आहे.

सविस्तर असे की, शिलापूर गावालगत असलेल्या बाघनदीवर गावातील मास्यांचे शौकिन मासेमारीसाठी नेहमीच जात असतात. मृत विलास वट्टी हा पण काल शुक्रवारला सकाळच्या सुमारास घरुन मासे पकडण्यासाठी नदीकाठावर गेला असता दुपारी परत न आल्याने घरच्या लोकानीं त्याची शोधाशोध केली असता तो नदीकाठी मृतावस्थेत सापडला. त्याच्या प्रेताची अवस्था पाहून त्याचा मृत्यू हा विजेचा धक्का बसल्याने झाल्याची शंका घटनास्थळवर उपस्थितांनी व्यक्त केली. प्रत्यक्षदर्शीनुसार, याठिकाणी काही लोक विजेच्या प्रवाहाचा वापर मासेमारीसाठी करीत असतात. त्यातच विलासचा मृत्यू झाला असण्याची शंका व्यक्त केली जात आहे.
मृताच्या पश्चात पत्नी, मुलगा-मुलगी, लहान भाऊ, म्रुत युवकाची आई असून या घटनेची नोदं देवरी पोलिसात करण्यात आली आहे. सदर घटनेचा तपास ठाणेदार रेवचंद सिंगनजुडे यांचे मार्गदर्शनात नायक गायधने करीत आहेत.

blank