
भंडारा, दि.15 :– जिल्ह्यात आज 563 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 52745 झाली असून आज 171 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 57176 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.25 टक्के आहे.
आज 1235 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 171 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आतापर्यंत 03 लाख 64 हजार 869 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 57176 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.
जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 50, मोहाडी 06, तुमसर 08, पवनी 03, लाखनी 51, साकोली 38 व लाखांदुर तालुक्यातील 15 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 52745 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची संख्या 57176 झाली असून 3415 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या 07 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 1016 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.25 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 01.77 टक्के एवढा आहे.शासकीय व खाजगी रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णांची कोविड चाचणी प्रिस्क्राईब करावी असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत
गडचिरोली जिल्ह्यात 550 कोरोनामुक्त, 12 मृत्यूसह 276 नवीन कोरोना बाधित
गडचिरोली,दि.15: आज जिल्हयात 276 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 550 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 27102 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 23624 वर पोहचली. तसेच सद्या 2863 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 615 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज 12 नवीन मृत्यूमध्ये ता. वडसा जि. गडचिरोली येथील 62 वर्षीय पुरुष, गडचिरोली येथील 50 वर्षीय पुरुष, गडचिरोली येथील 75 वर्षीय महिला, ता. कुरखेडा जि. गडचिरोली येथील 56 वर्षीय महिला, ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील 65 वर्षीय पुरुष, ता. मुलचेरा जि. गडचिरोली येथील 40 वर्षीय महिला, गडचिरोली येथील 48 वर्षीय पुरुष, गडचिरोली येथील 50 वर्षीय महिला, ता.आरमोरी जि. गडचिरोली येथील 60 वर्षीय महिला, ता. आरमोरी जि. गडचिरोली येथील 62 वर्षीय पुरुष, गडचिरोली येथील 40 वर्षीय महिला, ता. कुरखेडा जि. गडचिरोली येथील 68 वर्षीय पुरुष यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 87.17 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 10.56 टक्के तर मृत्यू दर 2.27 टक्के झाला.
नवीन 276 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 75, अहेरी तालुक्यातील 29, आरमोरी 07, भामरागड तालुक्यातील 04, चामोर्शी तालुक्यातील 65, धानोरा तालुक्यातील 6, एटापल्ली तालुक्यातील 14, कोरची तालुक्यातील 11, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 7, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 13, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 14 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 31 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 550 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 191, अहेरी 42, आरमोरी 63, भामरागड 11, चामोर्शी 46, धानोरा 15, एटापल्ली 24, मुलचेरा 17, सिरोंचा 21, कोरची 24, कुरखेडा 35 तसेच वडसा येथील 61 जणांचा समावेश आहे.





