37.1 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ कामठी कॅन्टोनमेंट कोविड केअर सेंटरला भेट ; १० ऑक्सिजन बेड सुरु करणार

कामठी कॅन्टोनमेंट कोविड केअर सेंटरला भेट ; १० ऑक्सिजन बेड सुरु करणार

0
20

blank

नागपूर, दि. 16: जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरीही धोका अजून टळलेला नाही. त्यामुळे राज्य शासन व प्रशासन सर्वतोपरी काळजी घेत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज कामठी कॅन्टोनमेंट कोविड सेंटरला भेट देत पाहणी केली.

यावेळी तहसीलदार अरविंद हिंगे, डॉ. अरुंधती काळे, डॉ. विवेक कुऱ्हाडे, अभियंता दीपक ठाकरे, राकेश सिंह आणि राजकुमार गजभिये उपस्थित होते.

कँन्टोनमेंट कोविड सेंटर येथे अगोदरपासून 26 खाटांचा विलगीकरण कक्ष निर्माण  करण्यात आलेला असून, आता येथे 10 ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर सुरु करण्यात येणार आहे. या कोविड सेंटरसाठी लागणारी आवश्यक वैद्यकीय उपकरणे, रुग्णवाहिका, ऑक्सिजन कॉन्संट्रेटर, डिजीटल एक्स रे मशीन येथे पुरविण्यात येणार आहे. कामठी कॅन्टोनमेंट येथे 10 ऑक्सिजनयुक्त बेडची सुविधा उपलब्ध होणार असल्यामुळे येथील नागरिकांना याचा लाभ होणार आहे. त्यामुळे रुग्णांचा होणार त्रास, वेळ आणि पैसाही वाचणार आहे.

कोविड केअर सेंटरच्या निर्मितीसाठी पालकमंत्री डॉ. राऊत यांनी वैद्यकीय उपकरणांसह, इतर आवश्यक बाबींचा आढावा घेतला. तसेच हे लवकरात लवकर जनतेच्या सेवेत दाखल करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती त्यांनी जाणून घेतली.

blank