
– डुग्गीपार पोलिसांची कारवाई
गोंदिया-डुग्गीपार पोलिसांनी तब्बल 30 वर्षापूर्वी चोरी गेलेल्या 40 सोन्याच्या मणीच्या एकदाणी चोरट्याचा शोध घेऊन ती एकदारी फिर्यादी महिलेच्या नातवाला 16 मे रोजी परत केली.
तालुक्यातील सितेपार येथील फुलनबाई गेंदलाल मडावी यांच्या घरुन त्यांची 40 सोन्याचे मणी असलेली एकदाणी चोरी गेली होती. याप्रकरणी त्यांनी डुग्गीपार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. डुग्गीपार पोलिसांनी तपासादरम्यान या प्रकरणातील चोरट्याला अटक करुन त्याच्याकडून एकदाणी हस्तगत केली होती. दरम्यान, एकदाणी परत घेण्यास कोणीही आले नसल्याने पोलिसांनी फिर्यादी फुलनबाई मडावी यांचा शोध घेतला असता त्यांचे 25 वर्षापूर्वी निधन झाल्याचे समोर आले. दरम्यान पोलिसांनी फिर्यादीच्या नातवाला बोलावून 16 मे रोजी अप्पर पोलिस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलिस अधिकारी जालींदर नालकूल व ठाणेदार सचिन वांगडे यांच्या उपस्थितीत एकदाणी परत करण्यात आली.





