
गोंदिया-वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. संसगार्ला रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. मात्र नागरिकांना अत्यावश्यक बाबीसाठी घराबाहेर पडण्यासाठी सकाळी ७ ते ११ वाजे या वेळेचे मुभा देण्यात आली आहे. तसेच संचारबंदी असल्यामुळे नागरिकांना कर भरण्यासाठी अगदी कमी कालावधीमिळत असल्याने नागरिकांना मालमत्ता कर भरण्यास सोयीकस्कर व्हावे, नगर परिषदेच्या वतीने कर विभाग सकाळी ७ वाजेपासून दुपारी ४.१५ वाजेपयर्ंत सुरू राहणार आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशनाच्या वतीने जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले. त्यातच नागरिकांना अत्यावश्यक सेवेसाठी फक्त ७ ते ११ वाजेपयर्ंत बाहेर पडण्याची वेळी ठरविण्यात आली. मात्र न.प. कर भरण्यासाठी ही वेळ सोयीस्कर ठरत नसल्याने नगर परिषदेच्या वतीने कर विभागाची वेळ सकाळी ७ ते दुपारी ४.१५ वाजेपयर्ंत केली आहे. तसेच जे कर्मचारी उपरोक्त वेळेत हजर नसल्यास त्यांचे त्या दिवसाचे वेतन कपात करण्यात येणार आहे. असे माहिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी दिली.





