34.7 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home गुन्हेवार्ता गीतांजली एक्स्प्रेसने अवैध दारूची वाहतूक;2 आरोपींना अटक

गीतांजली एक्स्प्रेसने अवैध दारूची वाहतूक;2 आरोपींना अटक

0
43

गोंदिया, दि.20 : लॉकडाउन व संचारबंदीच्या काळात आता रेल्वेने अवैध दारूची वाहतूक होत आहे. गीतांजली एक्स्प्रेसमधून अवैध दारूची वाहतूक करणार्‍या 2 आरोपींना रेल्वे पोलिसांनी अटक करून दरुसाठा जप्त केला आहे. ही कारवाई मंगळवार, 18 मे रोजी रात्री 9.15 वाजता करण्यात आली.

कोरोना काळात संचारबंदीचे नियम लागू असल्याने रस्त्यांवर नाकाबंदी व पोलीस तैनात आहेत. त्यामुळे दारू तस्करांनी दारूची वाहतूक करण्यासाठी आपला मोर्चा आता रेल्वेकडे वळविला आहे. अवैध दारूचा साठा नियोजित स्थळापर्यंत पोहचविण्यासाठी दारू तस्कर रेल्वे ट्रेनला माध्यम बनवीत आहेत. अशात रेल्वे पोलिसांनीसुद्धा गोंदियावरून जाणार्‍या सर्व गाड्यांची तपासणी आणखी कडक केली आहे. आधी सुद्धा रेल्वे मार्गाने दारूची तस्करी केली जात होती. परंतु, लॉकडाउनमध्ये हे प्रकार कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. अशात रेल्वे पोलीससुद्धा संशयित हालचालींवर नजर ठेवून आहेत.

गीतांजली एक्सप्रेस (गाडी क्रमांक 02259) मध्ये दारूची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर गाडी स्थानकात येताच बोगींमध्ये शोध घेण्यात आला. त्यावेळी बोगी डी-2 मध्ये दोन युवक संशयास्पद स्थितीत आढळले. तसेच त्यांच्याजवळ एक मोठा बॅग सुद्धा होता. चौकशी केल्यावर त्यांनी आपले नाव आशीष माकडे (वय 31) व किशोर अग्रवाल (वय 37) दोन्ही रा. दुर्ग असे सांगितले. दोघांना आरपीएफ पोस्टमध्ये नेण्यात आले व बॅग तपासण्यात आली. त्यात 90 मिलिने भरलेल्या 60 दारूच्या बाटल्या आढळया. चौकशीत आरोपींनी सांगितले की, अधिक नफा मिळविण्याच्या उद्देशाने दारू खरेदी करून दुर्गमध्ये ते अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करतात, त्यासाठीच ते सदर दारू खरेदी करून दुर्ग येथे नेत होते.दोन्ही आरोपींविरुद्ध मुंबई दारूबंदी कायद्याच्या कलम 65 (अ), 66 (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई एएसआय विनोद साहू यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

blank