35.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ नवेगाव बांध येथे शिव भोजन थाळी केंद्राचा शुभारंभ

नवेगाव बांध येथे शिव भोजन थाळी केंद्राचा शुभारंभ

0
36

blank

अर्जुनी मोरगाव,-कोरोना महामारीच्या काळात अनेकांचे रोजगार गेले. रोजगार गेल्याने रोज कमावून खाणाऱ्या गरजूंना एक वेळचे अन्न मिळणे कठीण झाले आहे. अण्णा वाचून कुणीही उपाशी राहू नये,गरिबांना अत्यल्प दरात अन्न मिळावे म्हणून राज्याच्या महाविकास आघाडीने मागील वर्षीपासून शिवभोजन थाळी उपक्रमाची सुरुवात केली. या उपक्रमांतर्गत मागील वर्षी अर्जुनी मोरगाव येथे विवो भोजन थाळी केंद्राचा 14 एप्रिल रोजी शुभारंभ करण्यात आला होता. तालुक्यातील नवेगाव बांध परिसरात हे केंद्र उभारन्याची परिसरातील नागरिकांची मागणी होती. राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांच्या पाठपुराव्याने नवेगावबांध येथे शुक्रवारला (21 मे) या नवीन शिवभोजन केंद्राचे शुभारंभ माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोने यांच्या हस्ते करण्यात आले. महामारीच्या काळात शंभर गरीब व गरजूंना शिवभोजन थाळीचा परिसरातील नागरिकांना लाभ होणार आहे.या लोकार्पण कार्यक्रमाला अन्न प्रशासन विभागाचे अधिकारी माहुले, नवेगावबांधचे सरपंच अनिरुद्ध शहारे,समाधान रेस्टोरेंट चे संचालक परेश उजवणे,उद्योगपती नवल चांडक,नवेगावबांधचे तलाठी पुंडलिक कुंभरे उपस्थितीत होते. या शिवभोजन केंद्राचा लाभ परिसरातील गरजूंनी घेण्याचे आवाहन माजी जिप सदस्य किशोर तरोने यांनी केला आहे.सदर शिवभोजन केंद्र प्रफुल पटेल यांच्या प्रयत्नांमुळे मंजूर झाले. उपस्थितांनी खासदार प्रफुल पटेल यांचे आभार मानले.

blank