35.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home गुन्हेवार्ता काळवीटांच्या मृत्यू प्रकरणी आरोपी वनविभागाच्या जाळ्यात

काळवीटांच्या मृत्यू प्रकरणी आरोपी वनविभागाच्या जाळ्यात

0
53

blank

बुलडाणा -एकाच वेळी जळगाव जा. तालुक्यातील तरोडा बु. येथील शेत शिवारात १० काळवीटांचा मृत्यू झाल्याची घटना १४ मे रोजी घडली होती. त्यानंतर १५ मे रोजी आणखी ३ काळविट मृत्यूमुखी पडल्याचे आढळून आले होते. दरम्यान वनविभागाच्या तपास यंत्रणेला ५ दिवसात आरोपीचा छडा लावण्यात यश आले असून त्याला जेरबंद करण्यात आले आहे. राधुसिंग छत्तरसिंग डावर, (वय ३३,रा. हनवतखेड ता.जळगाव जामोद ) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला २४ मे पर्यंत वनकोठडी सुनावली. शेत परिसरातील पाणवठ्याच्या ( शेतातील गड्डा) जागेवर शिकारीसाठी विष टाकले होते. त्यामुळे तब्बल १३ काळवीट मरण पावली. यातील एका काळविटाचे काही मासही आरोपीने खाण्यासाठी नेल्याची कबुली दिल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी कटारिया यांनी दिली आहे.

blank