41.3 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home Top News हरिणायात दलित कुटुंबाला जिवंत जाळलं

हरिणायात दलित कुटुंबाला जिवंत जाळलं

0
21

blank

वृत्तसंस्था वी दिल्ली, दि. २० – हरियाणातील फरिदाबादमधील सुनपेड गावात जातीयवादातून एका दलित कुटुंबाला जिवंत जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली असून यात दोन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार जातीयवादातून सोमवारी रात्री ही घटना घडली असून आणखी दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत.
सुनपेड गावात राहणा-या या कुटुंबावर काही अज्ञात व्यक्तींनी सोमवारी रात्री पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळले. या घटनेते दोन लहान मुलांसह चार जण जखमी झाले होते. त्यांना उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्या दोन बालकांचा होरपळून मृत्यू झाला. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

blank