37.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home गुन्हेवार्ता 14.74 लाखांची अवैध रोख रक्कम जप्त, रेल्वेने अवैधरित्या पैशाची वाहतूक

14.74 लाखांची अवैध रोख रक्कम जप्त, रेल्वेने अवैधरित्या पैशाची वाहतूक

0
49

blank

गोंदिया, दि.25 : गोंदिया रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर जनशताब्दी एक्सप्रेसमध्ये 14 लाख 74 हजार 300 रुपयांच्या रोख रकमेची अवैधरीत्या वाहतूक करणार्‍या पंडरीतलाई रायपूर (छत्तीसगड) येथील रहिवासी संजू मंगल बेहरा (वय 35) याच्या जवळून सदर रक्कम रेल्वे पोलिसांनी जप्त केली. ही कारवाई सोमवार, 24 मे रोजी दुपारच्या सुमारास करण्यात आली.
गोंदिया रेल्वे स्थानकावर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी रेल्वे पोलीस अधीक्षक एस राजकुमार यांच्या मार्गदर्शनात गोंदिया रेल्वे पोलिसांद्वारे सातत्याने तपास अभियान चालविण्यात येत आहे. त्या अंतर्गत तपासणी व गस्त दरम्यान सोमवार, 24 मे रोजी रेल्वे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण भिमटे यांना गोपनीय माहिती मिळाली की, रायपूरवरून येणार्‍या जनशताब्धी एक्सप्रेसमध्ये काही संशयास्पद वस्तू वाहून नेले जात आहे. ही माहिती मिळताच त्यांनी त्यांनी आपल्या स्टाफसह प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर उभ्या जनशताब्दी एक्सप्रेसमध्ये पेट्रोलिंग सुरू केली.

दरम्यान त्यांना एक व्यक्ती संशयास्पद स्थितीत आढळला. त्याची चौकशी केल्यावर त्याने आपले नाव संजू मंगल बेहरा (वय 35) रा. तरुणनगर, काली मंदिर माता वॉर्ड, पंडरीतलाई, जिल्हा रायपूर असे सांगितले.सदर गाडीने रायपूर जाण्याची माहिती दिली. त्याच्या खांद्यावर असलेल्या बॅगबाबत विचारणा केल्यावर त्याने असमर्थता दाखवत कोणत्याही प्रकारे समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे त्याच्या बॅगची तपासणी करण्यात आली. त्यात 2000, 500, 200 व 100 रुपयांच्या नोटा आढळल्या. सदर रकमेची मोजणी केल्यावर ते 14 लाख 74 हजार 300 रुपये असल्याचे आढळले. या रकमेच्या मालकी हक्काबाबत त्याने कोणतेही दस्तावेज किंवा पुरावे सादर केले नाही.सदर प्रकरणाची माहिती गोंदिया रेल्वे पोलिसांनी आयकर विभाग गोंदियाला दिली. ही रक्कम अवैध व्यवसायाशी संबंधित असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सदर कारवाई रेल्वे पोलीस अधीक्षक एस. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक वैशाली शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी एस.व्ही. शिंदे यांच्या मार्गदर्शनात गोंदिया रेलवे प्रभारी पोलीस अधिकारी अनीता खेड़कर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक प्रवीण भीमटे, पोलीस हवालदार अरुण गोंदोले, पोका ओमप्रकाश सेलौटे, नंदकिशोर नारनवरे, अखिलेश राय आदींनी केली.

blank