
अंजनसिगी – अशोक शिक्षण संस्था अशोकनगर द्वारा संचालित कान्होजीबाबा कनिष्ठ महाविद्यालय अंजनसिगी तर्फे पंधरा दिवसीय नलाईन व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे.व्यक्तिमत्त्व विकास व स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन अंतर्गत प्रा.संजय शेणमारे यवतमाळ यांनी विद्यार्थांना आॕनलाईन मार्गदर्शन केले.ते म्हणाले कि चार चौघात वावरतांना,भाषण देताना ,मुलाखत देताना तुम्हांला अडचण येत असेल तर तुम्ही फ्ट स्किलचा उपयोग करावा.नेतृत्वगुण असेल तर जिवण आनंदमय होईल.संवाद कौशल्य आपल्यात असावे.आपल मत इतरांना समजावून सांगता आल पाहीजे.योग्य आवाज चढ उतार असावा.आपण इतरांना फाॕलो करतो लीड करत नाही.वेळेचा सदुपयोग करा.प्रत्येक मिनीटाचे नियोजन करा.स्वतःचे धेय्य ठरवा.जेथे काम करतो तेथे किंवा कुटुंबात जुळवून घेता आल पाहिजे .चांगल्यात चांगल निवडा.मानसांची व चांगल्या वैचारिक व्यक्तीची साखळी निर्माण करता आली पाहीजे.या विविध कौशल्याने आपण जिवणात यशशिखरे काबिज करतो.





