33.9 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ खासदार अशोक नेते यांचा कोविड रूग्णांना दोन प्राणवायू प्रणाली उपलब्ध

खासदार अशोक नेते यांचा कोविड रूग्णांना दोन प्राणवायू प्रणाली उपलब्ध

0
28

blank

#कार्यकर्त्यांना कोविड रुग्णांना मदतीचे ध्येय
आमगाव, २५ मे- तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पहाता सामान्य जनतेसाठी अधिक दोन प्राणवायू प्रणाली संच खासदार अशोक नेते यांच्याद्वारे उपलब्ध करण्यात आले आहे.
खासदार अशोक नेते यांनी आमगाव तालुक्यातील कोविड नियंत्रण आढावा बैठक घेतली होती, यात रुग्णांना प्राणवायू सयंत्र उपलब्ध करून देण्यासाठी मागणी करण्यात आली होती.
खा.नेते यांच्या पुढाकाराने टप्याटप्याने तालुक्यात प्राणवायू सयंत्र उपलब्ध करून देण्यासाठी सार्थक पाऊल उचलले व अधिक प्रमाणात प्राण वायू सयंत्र उपलब्ध करून दिली.
खासदार नेते यांच्या हस्ते गडचिरोली येथे भाजप कार्यालयात ,भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा महामंत्री उत्तम नंदेश्वर, नगर भाजप अद्यक्ष सुगमचंद अग्रवाल , सामाजिक कार्यकर्ते यशवंत मानकर यांना प्राण वायू सयंत्र कोविड रुग्णांना उपलब्ध करून दिली.यावेळी खासदार नेते यांनी भाजप कार्यकर्ते कोविड रुग्णांना मदतीचे द्येय ठेऊन कार्य करीत आहेत, यात यथावत मदत केली जाईल असे त्यांनी यावेळी आश्वाशीत केले.
तालुक्यातील ज्या कोरोना बाधितांची प्रकृति फारशी गंभीर नाही मात्र प्राणवायूची गरज आहे अशा रुग्णांसाठी प्राणवायू प्रणाली दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या गरजू नागरिकांना किंवा कोव्हीडबाधित मात्र गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांना प्राणवायूची गरज असल्यास भाजपा मंडळ पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे भाजप तालुका मंडळ वतीने कळविण्यात आले आहे.

blank