43.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ व्हॅक्सिनेशन कार्यक्रमातून शिक्षक बेपत्ता,मोरवाही आरोग्य केंद्रातील प्रकार

व्हॅक्सिनेशन कार्यक्रमातून शिक्षक बेपत्ता,मोरवाही आरोग्य केंद्रातील प्रकार

0
171

blank

गोंदिया(ता.26)- सध्या covid-19 या आजाराने ग्रामीण भागात थैमान घातले असून या रोगाला आटोक्यात आणण्यासाठी लसीकरणाची मोहीम युद्धस्तरावर राबविण्यात येत आहे. ही मोहीम यशस्वीरित्या राबविण्यासाठी गावातील शिक्षकांचा सहभाग या मोहिमेत अत्यावश्यक करण्यात आला आहे. परंतु या मोहिमेत शिक्षक सहभागी दिसत नसल्याने या मोहिमेतून शिक्षक बेपत्ता झाल्याचा धक्कादायक प्रकार गोंदिया तालुक्यातील मोरवाही आरोग्य केंद्रात उघडकीस आलाआहे. मोहिमेत आता बेपत्ता राहणाऱ्या शिक्षकांवर निलंबनाची कारवाही करण्याची मागणी ग्रामस्थांनी लावून धरली आहे.
सध्या ग्रामीण भागातील covid-19 रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी शासनाने पंचेचाळीस वय झालेल्या नागरिकाना वॅक्सिनेशन अनिवार्य केले आहे. या लसीकरण कार्यक्रमात कोणतीही अडचण येऊ नये, अशिक्षित नागरिकांना नोंदणी सोपस्कर व्हावी, लसीकरणासाठी गावात जनजागृती व्हावी, यासाठी प्रत्येक उपकेंद्रावर त्या गावातील दोन शिक्षकांची सेवा संपूर्ण दिवसभरासाठी अनिवार्य केली आहे, परंतु लसीकरण केंद्रावर शिक्षक बेपत्ता दिसून येत आहेत. त्यामुळे माहिती अभावी अशिक्षित नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. लसीकरण स्थळी केवळ आरोग्य कर्मचारीच दिसून येत आहेत. त्यामुळे शिक्षक गेले कुठे असा प्रश्न गावकरी उपस्थित करीत आहेत.
मोरवाही आरोग्य केंद्रात बटाना, मुंडीपार, असोली, बरबसपुरा, टेमनी, दत्तोरा, नवरगाव कला, नवरगाव खुर्द,इर्री, व मोरवाही या गावांचा समावेश होत असून सर्वच गावात हा प्रकार पहावयास मिळत आहे. त्यातच बटाना उपकेंद्रात सोमवारी (ता. 24) आलेल्या तीस डोज पैकी केवळ तीनच वॅक्सिनेसन करण्यात आले.उर्वरित विस डोज आरोग्य केंद्राला परत करण्यात आले तर सात डोज नस्ट करण्यात आले.यासंबंधात बटाना येथील उपसरपंच दिपक साठवणे यांना विचारले असता या कार्यक्रमाची कोणतीही माहिती गावत नसल्याची त्यांनी सांगितलं. या लसीकरणा च्या दिवशी बटाना शाळेतील एकही शिक्षक या लसीकरण स्थळी उपस्थित नव्हते.तसेच लसीकरणाची कोणतीही माहिती गावकऱ्यांना उपलब्ध होत नसल्यामुळे गावकरी उपकेंद्रात येत नसल्याची माहिती येथील एका आरोग्य परिचारिकेने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितली. परिणामी आलेले डोज आरोग्य केंद्राला परत करून काही डोज नस्ट करावे लागत आहे.
covid-19 हि राष्ट्रीय आपत्ती असून या कार्यक्रमात कोणीही हयगय करू नये अशे निर्देश शासना तर्फे देण्यात आले असले तरी शासनाचे कर्मचारी असलेले शिक्षक हेच शासन निर्देशांची पायमल्ली करताना दिसून येत आहेत. अशा बेपत्ता राहणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी मोरवाही आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या गावातील नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.

ही सत्य परिस्थिती आहे, शासनाच्या निर्देशाप्रमाणे आम्हाला मदत व्हावी म्हणून आम्ही शिक्षकांना बोलावितो परंतु ते आम्हाला प्रतिसाद देत नाही. डॉ.नितीन काटोले, प्रभारी वैद्यकीय अधिकारी मोरवाही.

blank