
बुद्ध पौर्णिमा निमित्त ऑनलाइन धम्म देसना/ धम्म संदेश
गोंदिया:- बुद्ध आणि त्याचा धम्म जगाला तारक आहे. धार्मिक कर्मकांड, अंधश्रद्धेच्या पलीकडे वैज्ञानिक दृष्टीकोण राखून बुद्धांनी प्रज्ञा शील करुणा मैत्री, अष्टांगीक मार्ग, दहा पारमिता दिलेल्या आहेत. या मार्गावर चालून विश्वाचे आणि समस्त मानवजातीचे कल्याण होऊ शकते. अनुयायी उपासकांनी बुद्धांचे विचार ख-या अर्थाने आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणले पाहिजे. कोणत्याही प्रकारच्या कर्मकांडात न अडकता वेळेचं म्हत्व जाणुन, पैशाची उधळपट्टी न करता भावी पिढीकरिता शैक्षणिक संस्थान आणि प्रशिक्षण केंद्र निर्माण करावे” असे मार्गदर्शन पर प्रतिपादन भदंत डॉ. चंद्रकित्ती ( मेरठ) यानी केले. बुद्व पौर्णिमा निमित्त आयोजित “धम्म देसना” धम्म संदेश ऑनलाइन वेबिनार मध्ये ते बोलत होते.
तथागत गौतम बुद्धांचे मानवतावादी विचार आणि त्यांचा धम्म विश्व उद्धारक आहे. बुद्धांचे मानवतावादी विचार संदेश सर्व समाजातील जनमाणसात पोहचले पाहिजे जेणेकरून त्यानी त्याचा अनुसरण केले पाहिजे व आचरणात आणलं पाहिजे या ऊद्देश्याने बुद्ध पौर्णिमचे औचित्य साधून दि. 20 मे ते 26 मे पर्यंत संविधान मैत्री संघ, समता सैनिक दल, महिला सशक्तीकरण संघ व सर्वसमाज विचार महोत्सव समिती यांच्या संयुक्त वतीने विविध ऑनलाइन बौद्धीक व जागृती कार्यक्रम उपासक- उपसिका- विद्यार्थी सर्व सामान्यांसाठी आयोजित करण्यात आले. ऑनलाइन जागृती सप्ताह कार्यक्रम “बुद्ध आले दारी” अंतर्गत धम्म देसना व्यतिरीक्त वृक्षारोपण, बुद्ध वंदन- अभिवादन, बौद्ध बनो- बौद्ध दिखो, प्रश्नमंजूषा, चित्रकला, क्राफ्ट प्रदर्शनी, बौद्ध दर्शन, बुद्ध के मानवतावादी विचार, बौद्ध काव्य रचना-गीत प्रस्तुती या प्रकारे अन्य बौद्धीक प्रतियोगीता कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या स्पर्धा प्रतियोगीतेचे निकाल 28 मे ला घोषित करण्यात येणार आहेत.
सर्व विदित आहे कि कोरोना महामारी च्या काळात फिजिकल डिस्टेंस व लॉकडाउन नियमांचे पालन करत असताना बौध्द विहार येथे जाने संभव नसल्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातुन सदर जागृती सप्ताह “बुद्ध आले दारी” उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात गोंदिया जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून अनुयायी शामिल झाले होते.





