गस्तीवर गेलेल्या वनरक्षकाचा मृतदेह तलावात आढळला

0
83

गोंदिया- देवरी वनविभाग कार्यालयात कार्यरत गस्तीवर गेलेल्या वनरक्षकाचा मृतदेह राजनडोंगरी क्षेत्रातील तलावात आज, 31 मे रोजी आढळून आला. योगेश विठ्ठल शेंडे (54) रा.देवरी असे मृत वनरक्षकाचे नाव आहे. देवरी वनविभागातील वनरक्षक योगेश शेंडे हे 30 मे रोजी सकाळी राजनडोंगरी क्षेत्रातील वन परिसरात गस्तीवर गेले. मात्र 31 मे रोजी सकाळपर्यंत ते घरी परतले नाही. त्यामुळे त्यांच्या कुटूंबियांनी वनविभागचे कार्यालय, गावात व नातेवाईकांकडे त्यांचा शोध घेतला. मात्र ते सापडले नाही.
दरम्यान त्यांच्या मुलाने ते कर्तव्यावर असलेल्या राजनडोंगरी वन क्षेत्रात वडीलांच्या मोबाईलचा माग घेत शोध घेतला असता राजनडोंगरी क्षेत्रातील तलावात त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच देवरी पोलिसांनी घटनास्थळ गाठले व योगेश शेंडे यांचा मृतदेह तलावाबाहेर काढला व शवविच्छेदनासाठी पाठविला. त्यांच्या मृत्यूचे मूळ कारण समोर आले नसले तरी त्यांनी विषप्राशन करुन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक उरकुडे, नायक पोलिस शिपाई चौधरी, हातझाडे, गायधने करीत आहेत.