33.9 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home राजकीय शरद पवारांच्या भेटीला देवेंद्र फडणवीस; राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

शरद पवारांच्या भेटीला देवेंद्र फडणवीस; राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

0
40

blank

मुंबई – आज(सोमवार) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबई येथील सिल्वर ओके या त्यांच्या निवासस्थानी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली आहे. काही काळ या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा देखील झाल्याचे समोर आले आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.या भेटीचा फोटो ट्विट करून देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे. माजी केंद्रीयमंत्री आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची आज त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. असे ट्विट फडणवीस यांनी केले आहे.

काही दिवसांपूर्वी शरद पवारांवर शस्त्रक्रिया झाली आहे. यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली आहे. शरद पवारांनी फडणवीस मुख्यमंत्री असताना अनेकदा विविध कारणांसाठी त्यांची भेट घेतलेली आहे. त्यामुळे आता फडणवीसांनी देखील पवारांची भेट घेतली असल्याचे एक कारण सांगितले जात आहे. त्याचबरोबर राज्यात सध्या मराठा आरक्षण व अनेक महत्वाचे मुद्यांवरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, शरद पवार हे ज्येष्ठ नेते असल्याने याबाबतही या भेटीत चर्चा झाली असावी, असे सांगितले जात आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या सर्व पुनर्विचार याचिका फेटाळून लावत आरक्षणाला स्थगिती दिली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयाच्या या निकालानंतर ठाकरे सरकारवर जोरदार प्रहार केला आहे. महाराष्ट्रात ओबीसीसाठी राजकीय आरक्षण शिल्लक राहिलेले नसल्याचे सांगत फडणवीस यांनी आरक्षण कशाप्रकारे घालवले हे समोर ठेवायचे असल्याचे सांगितले. राज्य सरकार आरक्षण रद्द होण्यास कारणीभूत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

blank