37.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ राजकीय पुढाऱ्यांचे अपयश व अधिकाऱ्यांचा मुजोरपणा

राजकीय पुढाऱ्यांचे अपयश व अधिकाऱ्यांचा मुजोरपणा

0
39

#आमगाव नगर परिषद
#आठ कोटीचे विकास कामे थांबली
#नवीन योजना निधी नाही.
#नागरिक झाले त्रस्त
आमगाव:आमगाव ग्रामपंचायत ते नगरपरिषदचा निर्माण खडसर प्रवास सुरू आहे.न्यायालयीन प्रकरणात अनिर्णित निकाल असल्यामुळे मात्र नागरिक होरपळत आहेत.विकास कामे नाहीत. विकासकामांसाठी राजकीय नेते अपयशी ठरले तर अधिकारी मिजोरशाही ने कामे करीत आहेत याची झळ जनतेला पडत आहे.
राज्य शासनाने आमगाव ग्रामपंचायत ला सन २०१५ ला नगरपंचायत महणून नव्याने स्थापना केली तर तद्नंतर नागरिकांच्या मागणीप्रमाणे पुन्हा सन २आगष्ठ २०१७ ला न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शन प्रमाणे आठ गाव मिळून नगरपरिषदचा निर्माण केला.
यातच राजकीय नेते आपसात श्रेय लाटण्यासाठी वर्चस्वाला समोर आले.आणि नागरिकांचा घात केला.
नगरपरिषदचा विषय न्यायप्रविष्ट आहे. वर्तमानात नगरपरिषद अद्यावत आहे.नगर परिषद अंतर्गत विविध योजनांच्या माध्यमातून विकास कामे,रोजगार ,जमीन हक्क प्रकरण ,रस्ते,गटार नाले विकास ,नागरिकांना मिळणारे हक्काचे आवास योजनाचे लाभ या बाबतीत मात्र न्याय मिळवून देण्यासाठी कुठेच प्रयत्न करण्यात येत नाहीत . यामुळे सर्वच बाबतीत नागरिकांना न्याय मिळवून घेण्यासाठी सहा वर्षाचा वनवासात संपले.
आमगाव नगरपरिषद परिक्षेत्रातील नागरिकाना विकास कामे ग्राह्य असताना त्यांना विकासापासून जाणीवपूर्वक डावलण्यात येत आहे.नगर परिषद प्रशासनाने अनेक योजनांचे कृती आराखडा तयार करून जिल्हा नगर विकास विभाग व नगर विकास मंत्रालय कडे पाठपुरावा केला परंतु या प्रस्तावना मंजुरी मिळवण्यास स्थानिक जनप्रतिनिधी यांना यश मिळवता आले नाही ,तर जिल्हाधिकारी नियंत्रणात असलेले जिल्हा नगर विकास विभाग मुजोरपणा बाळगून योजना प्रस्तावांना फाईलबंद करून ठेवले आहे.
आमगाव समाविष्ट आठ गावातील लोकसंख्या प्रमाणात मागणी असलेल्या विकास कामाची अत्यावश्यकता असताना अद्याप त्यांना प्रशासकीय मान्यता देण्यात आले नाही. यात नागरिकांना मात्र अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

आर्थिक वर्ष २०१९-२० ला विशेष अनुदान योजनेतून आठ कोटींचे बांधकाम मंजूर करण्यात आले, परंतु आर्थिक वर्ष २०२०-२१ संपले असून सुद्धा सदर मंजूर कामांना निधी उपलब्ध करून देण्यात आले नाही.त्यामुळे मंजूर कामे ठप्प पडली आहे.नगर परिषद ला शासनाकडून विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी नवीन योजना आखली जाऊन त्याचे प्रस्ताव सादर करण्यात आले. परंतु नवीन योजनाही मंजूर करण्यात येत नाही. त्यामुळे नागरिकांनी संयम सुटत चालला आहे.राजकीय पुढारी व प्रशासनाची उदासीनता नागरिकांच्या विश्वासाला तडा देत आहेत.

नगर परिषद स्थापन करण्यासाठी ज्यांनी श्रेय लाटण्यासाठी पुढाकार घेतला, तर ज्यांनी नगर परिषद नको म्हणून लढा दिला असे पुढारी व खासदार आमदार आहेत कुठे ? नागरिक फक्त टॅक्स मोजत आहेत,पण विकास नाही . ही सर्व नागरिकांसाठी शोकांतिका आहे. जनतेनेच यासाठी संघर्ष पेटवायला हवा अशी प्रतिक्रिया माजी उपसरपंच रवी श्रीसागर यांनी वेक्त केली

blank