34.7 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home राजकीय पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात विदर्भात काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन

पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात विदर्भात काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन

0
31

blank

गोंदिया/चंद्रपूर,बुलढाणा— महाराष्ट्र  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे निर्देशानुसार, केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेल दरांमध्ये केलेल्या अवास्तव दरवाढीचा निषेध करण्याकरिता संपूर्ण राज्यात सोमवारी काँग्रेसच्या वतीने राज्यात विविध ठिकाणी पेट्रोलपंपावर आंदोलन करुन निषेध नोंदवण्यात आला.

गोंदिया येथे जिल्हा काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले.जिल्हाध्यक्ष नामदेवराव किरसान,अशोक गुप्ता,जितेश राणे,राजु काळे,योगेश अग्रवाल,जहीर अहमद,पप्पू पटले,जिवन शरणागत,परवेज बेग,विजय बोरांडे आदी काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. गोरेगाव येथे तालुका काँग्रेस अध्यक्ष डेमेंद्र रहागंडाले,मलेश्याम येरोला यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पेट्रोलपंपावर आंदोलन केले.blank

चंद्रपूर जिल्ह्यात आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वाखाली कोरपना येथे बसस्थानक चौकात तर गडचांदूर येथे राजीव गांधी चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने केली.तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विठ्ठलराव थिपे यांनी प्रास्ताविक भाषणात पेट्रोल, डिझेल व गॅस इंधन दरवाढ करून जनतेच्या पैशावर डल्ला मारत आहे. प्रधानमंत्री यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा अशी मागणी तालुका काँग्रेस तर्फे करण्यात आली. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजय बावणे यांनी आपल्या भाषणातून मोदी सरकारच्या ध्येय धोरणावर टीका केली. माजी सभापती तथा विद्यमान पंचायत समिती सदस्य शाम रणदिवे, माजी जि. प.सदस्य उत्तम पेचे यांनी निषेधार्थ आपले मत व्यक्त केले.blank

गडचांदूर येथे नगराध्यक्षा सविता टेकाम, हंसराज चौधरी, पापय्या पोन्नमवार, शहराध्यक्ष संतोष महाडोळे, गटनेता तथा सोशल मीडिया अध्यक्ष विक्रम येरणे, सभापती राहुल उमरे, उपसरपंच आशिष देरकर, नगरसेवक अरविंद मेश्राम, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष शैलेश लोखंडे, महासचिव विलास मडावी, माजी शहराध्यक्ष रोहित शिंगाडे, महिला शहर अध्यक्ष अर्चना आंबेकर, प्रितम सातपुते, आशिष वांढरे, संजय इटनकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

कोरपना येथे सिताराम कोडापे, भाऊजी चव्हाण, राजाबाबू गलगट, गणेश गोडे, भारतजी चन्ने, कोरपना शहराध्यक्ष सुनिल बावणे, मनोहर चन्ने, इस्तारी गुज्जेवार, रसूल पटेल, निसार शेख, रोशन आस्वले, कवडू मडावी, शेख अफजल, भिमरतन भगत, भारत गौरी, यश दुर्गमवार, दिपक भगत, अरुण पारखी, इसाक बेग, बाबाराव मालेकर, रोशन मरापे, विलास मडावी, स्वप्नील गभने, उत्तम गेडाम, कवडू खोबरकर आदींनी सहभाग घेतला.blank

बुलडाणा जिल्हा- काँग्रेस कमिटीच्या आवाहन नुसार डिझेल,पेट्रोल दरवाढीच्या विरोधात पेढे वाटून गांधीगिरी करण्यात आली. तयावेळी जिल्हा काँग्रेस कमिटी चे उपाध्यक्ष रिझवान सौदागर, माजी उपसभापती भानुदास राऊत, पंचायत समिती सदस्य प्रभाकर वाघ, धाड ग्रामपंचायतचे उपसरपंच अभिमन्यू तायडे ग्रामपंचायत सदस्य मोहम्मद शफीक प्रदीप तायडे बबन कानडजे शिवाजी देशमुख इब्राहिम जमादार नाझिम जमादार सय्यद नासिर रब्बानी सौदागर सोहराब खान शाहेद सौदागर मो. शाफिक शकुर बागवान हे उपस्थित होते.मोदी सरकारने केलेल्या दरवाढीचा पेढे वाटून अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त करण्यात आला.

blank