
कोसमतोंडी:-(महेंद्र टेंभरे):– महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या वतीने खा. प्रफुलभाई पटेल यांना निवेदन देऊन पोलीस पाटील यांचे सेवानिवृत्ती वय ६० वर्षे वरून ६५ वर्षे करण्याची मागणी करण्यात आली.निवेदन देतेवेळी आमदार मनोहर चंद्रीकापूरे, माजी विधान परिषद सदस्य राजेंद्र जैन, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष डॉ.अविनाश काशिवार हजर होते.
माहितीनुसार पोलीस पाटील हे पद मानधन तत्वावर मानसेवी पद म्हणून कार्यरत आहे.आपातकालिन व नैसर्गिक परिस्थितीत शासनास वेळोवेळी सहकार्य करीत असतात.सन २०२०पासून कोविड-१९ कोरोना संकटाचा सामना करित असतांना मदत कार्यामुळे आजपर्यंत ४३ पोलीस पाटील मृत्यूमुखी पडले आहेत. मागिल चार वर्षांपासून नविन पोलीस पाटील यांची पदे भरण्यात आली नाही.आणि अजुन दोन वर्षे रिक्त जागा भरण्याची शक्यता नाही . त्यामुळे राज्यात ४० टक्के पोलीस पाटील यांची पदे रिक्त आहेत.एका पोलीस पाटीलाला अनेक गावांचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.
पोलीस पाटील हे पद मानधनी कर्मचारी असल्यामुळे अंगणवाडी सेविका प्रमाणे त्यांना वयाची अट लागू होत नाही.सध्या कोविड-१९ कोरोना संक्रमणाची परिस्थिती पाहता पोलीस पाटील पदाला मुदतवाढ देण्याची आवश्यकता आहे.विशेप बाब म्हणून या पदावर कार्यरत असलेल्या पोलीस पाटील यांचे सेवानिवृत्ती वय ६५ वर्षे करण्यात यावे.व कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या सर्व पोलीस पाटील यांच्या वारसांनाची नियुक्ती त्यांचे रिक्त झालेल्या जागी करण्यात यावी.आणि सर्व सेवानिवृत्त पोलीस पाटील यांना सेवानिवृत्तीची योजना लागू करण्यात यावी,अशी मागणी संघटनेने वतीने करण्यात आली आहे.सदर मागण्यांबाबत सहकार्य करण्याचे आश्वासन खा.प्रफुलभाई पटेल यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले. सदर निवेदन पोलीस पाटील संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष भृंगराज परशुरामकर, जिल्हा अध्यक्ष दिलीप मेश्राम,श्रीराम झिंगरे,नंदाबाई ठाकरे,उमेश वाढई,बोरकर पाटील यांनी खा.प्रफुलभाई पटेल यांना दिले आहे.