
सावली,दि.08ः- स्थानिक स्वराज्य संस्थांमधील धोक्यात आलेले ओबीसीचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी राज्यसरकारने कोर्टाच्या निर्णयानुसार कार्यवाही करावी.इतर मागासवर्गीय अधिकारी/कर्मचारी यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करावी आणि ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी इत्यादी मागण्यासंदर्भात ओबीसी शिष्टमंडळाने काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांना निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा केली.यावेळी राज्याचे ओबीसी, बहुजन कल्याण मंत्री आमदार विजय वडेट्टीवार उपस्थित होते.
यावर पटोले यांनी मागण्या रास्त असून त्या मार्गी लावल्या जातील असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. शिष्टमंडळात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे तालुका अध्यक्ष कविंद्र रोहनकर, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अविनाश पाल, दिवाकर गेडाम,गिरीश चीमुरकर, किशोर घोटेकर,दीपक जवादे , मनिषाताई जवादे, सूनिताताई उरकुडे निखील सुरमवार, कुनघाडकर सर, सुनील पाल,विनोद रोहनकर, हिवराज शेरकी,केशव भरडकर तुळशीदास भुरसे, आशिष मनबतुनवार,नितीन गोहणे , गुरुदेव भूरसे, अरविंद निकेसर,अविनाश भुरसे, आदी ओबीसी बाधव उपस्थित होते.




